
प्रतिनिधी : सुरेश बोर्ले
पुणे : पुण्यातील मानाच्या गणपती बाप्पांनसहीत,इतर सार्वजनिक मंडळांच्या गणपतींचे विसर्जन थाटात पार पडले.
प्रतिनिधी…पुणे तेथे काय उणे?तर महाराष्ट्राची सांस्कृतिक नागरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या,ह्या नगरीतील गणेशोत्सवही अगदी परंपरागत असतो.पुण्यातील नाक्या नाक्यांवर बाराही महिने विस्थापित व जतन केलेल्या गणेश प्रतिमा आपण पाहतो.पण गणेश चतुर्थी ते अनंत चतुर्थीला ह्या शैक्षणिक पंढरीत भारी उत्साह असतो.१०दिवस ही नगरी गणेशाच्या भक्तीने जागी राहते.पुणे ढोल ताशे नगारे पथके,ध्वज पथके,लेझींम पथके,वेदाचे पठण हे खास वैशिष्ट आहे.जी परंपरा आता मुबई सहित अनेक शहरात थेट अमेरिका,ब्रिटन आदी आंतरराष्ट्रीय खंडातही दिसते.तर अशा ह्या अनंत चतुर्थीच्या विसर्जनात,आज पहाटे पर्यंत चालणाऱ्या ह्या मिरवणुकीत!मानाच्या कसबा पेठ,तांबडी जोगेश्वरी,गुरुजी तालीम,तुळशी बाग आणि केसरी वाडा गणपतींचे विसर्जन अगदी थाटामाटात पार पडले. नंतर दगडूशेठ हलवाई गणपती,मंडई गणपती व इतर सार्वजनिक गणपती मंडळाचे विसर्जन पार पडले.नियम व शिस्त हे पुण्याचे शान आहे.त्याची प्रचिती आज ह्या उत्सवात आली.कारण रात्री१२.०० वाजता ढोल व डी जे.पथके बंद करून,ती सकाळी ६.००वाजत पुन्हा त्याच उत्साहात सुरू झाली व बाप्पांचे विसर्जन पार पडले.कोणाही अनुचित प्रकार घडला नाही,ही विशेष.
Good