​पूरग्रस्तांच्या मदतीचा “स्नेह-दिवा”

Share

प्रतिनिधी : वैशाली महाडिक

​एक हाक, एका कुटुंबासाठी…

​मराठवाड्यातील महापूर आणि अतिवृष्टीमुळे शेतकरी व नदीकाठच्या गावांचे शेती, जनावरे व घरांचे अतोनात नुकसान झाले आहे. या नैसर्गिक संकटाने त्यांना मोठा मानसिक धक्का दिला आहे.

​महाराष्ट्रातील संवेदनशील जनतेने या संकटात मुक्तपणे मदत करून माणुसकी जपली आहे.
साने गुरुजींचे राष्ट्र सेवा दल यात मागे कसे राहील? ​महाराष्ट्र राष्ट्र सेवा दलाच्या कोअर ग्रुपने या कार्यात उडी घेतली आहे. विशेषतः सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील दारफळ-सीना या गावातील नवभारत विद्यालय आणि गावकरी यांच्यासाठी सेवा दलाच्या सैनिकांनी घरोघरी जाऊन तडफेने मदत पोहोचवली आणि त्यांना आधार देण्याचा आमच्या छोट्याशा ताकदीने अल्पसा प्रयत्न केला.
​आता या पूरग्रस्त बांधवांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवण्यासाठी, त्यांच्या मनातील तणाव दूर करून आनंद निर्माण करण्यासाठी आणि त्यांना या दीपोत्सवाच्या शुभेच्छा देण्यासाठी महाराष्ट्र,राष्ट्र सेवा दल सज्ज झाले आहे!
​येत्या शुक्रवार दिनांक १७ व शनिवार दिनांक १८ नोव्हेंबर रोजी सेवा दलाचे सैनिक त्यांच्या भेटीला जात आहेत. सोबत थोडा दिवाळी फराळ घेऊन, तुमच्या शुभेच्छांसह त्यांच्या अंगणात भावनेचा दिवा लावण्याचा हा छोटासा प्रयत्न आहे.
​आपण आजपर्यंत ज्या आपुलकीने साथ दिलीत, तशीच या वेळीही द्या.
तुमचा छोटा फराळ, तुमच्या शुभेच्छांसह आमच्याकडे द्या. आम्ही तो गावातील प्रत्येक घरात भेट देऊन, तुमच्या सहवेदना आणि भावनांसह त्यांच्याकडे पोहोच करू. गाव साधारण 450 वस्तीचे आहे.

​फराळ किटमध्ये समाविष्ट वस्तू (एकूण ५ वस्तू):
​दोन लाडू, ​दोन करंजी, ​चिवडा (एक पॅकेट),​चकली (एक पॅकेट),​शंकरपाळी (एक पॅकेट)
​एका फराळ किट साठी योगदान: ₹ ४००/-
​पूरग्रस्तांची ही दिवाळी संस्मरणीय करू या! तुमच्या भावनेचा दीप त्यांच्या अंगणात लावून त्यांच्या आयुष्यात नवी उमेद निर्माण करू या!
​राष्ट्र सेवा दल, महाराष्ट्र कोअर कमिटी
​संपर्क:
​संजय रेंदाळकर (इचलकरंजी): 96048 21941
​सुहास कोते (ठाणे):
98927 61143
रोहित शिंदे मिरज 86984803039
प्रा. आनंद साठे 9075936628
प्रवीण वाणी 9370633050
सुधीर खाडे+8796483564
​बबन शिंदे (दारफळ)
: 96651 79547
​संजय गायकवाड:
99700 04540
​आपल्यापैकी कुणी या दिवशी येऊ इच्छित असाल.आपल्यातील कला तिथं सादर करू इच्छित असाल किंवा आमच्या सोबत सहभागी होऊ इच्छिता तर नक्की संपर्क करा असे आवाहन करण्यात आले आहें.🤝


Share

2 thoughts on “​पूरग्रस्तांच्या मदतीचा “स्नेह-दिवा”

  1. फार सुन्दर विचार आहे हिच खरी दिवाली आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *