पेट्रोलियम मंत्र्यांनी दिले डिझेलचे दर कमी करण्याचे आश्वासन.

Share

एसएमएस -प्रतिनिधी – उत्कर्ष बोर्ले

मुंबई : नॅशनल फिशवर्कर्स फोरम (NFF), महाराष्ट्र मच्छिमार कृति समिती (MMKS),महाराष्ट्र राज्य मच्छिमार सहकारी संघ व ठाणे जिल्हा मच्छिमार सहकारी संघ यांचे शिष्टमंडळ दिल्ली येथे केंद्रीय मत्स्यव्यवसाय मंत्री राजीव रंजन (ललान सिंग) तसेच पेट्रोलियम मंत्री हरदिप सिंग पुरी यांची भेट घेण्यासाठी दिल्ली येथे गेले होते, केंद्रीय मत्स्यव्यवसाय मंत्री पटना ला असल्यामुळे त्यांची भेट होऊ शकली नाही. परंतु डिझेल चा विषय आहे ते केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंह पुरी यांची खासदार डाॅ. हेमंत सावरा, खासदार श्रीकांत शिंदे, खासदार नरेश म्हसके यांच्या प्रयत्नाने कर्तव्य भवन येथे भेट झाली. व विस्तृत चर्चा झाली. तथा मच्छिमारांना बल्क कॅटेगरीत वगळावे आणि जो भाव पेट्रोल पंपावर आहे,तोच दर आम्हाला असावा असे सांगितले. तसेच २०२२ साली आपणच प्रश्न सोडविला होता. आणि आपल्याला स्पेशल कॅटेगरी (मच्छिमार कल्यान निधी) करू असे आपण त्यावेळी सांगितलं होत. अशी त्यांना आठवण करून दिली, त्यांनी सांगितले की, माझे मनात आहे. की हा प्रश्न कायमचा सोडवावा. आम्ही त्याचा विचार करीत आहोत, पण युद्धजन्य परिस्थिती असल्यामुळे आता आम्ही काहीच करू शकत नाही. मी तुम्हाला आठवड्या नंतर बोलवून ह्या विषयावर मार्ग काढीन असे सांगितले.
त्यानंतर आम्हाला खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचे निवासस्थानी त्यांनी बोलविले तेथे खासदार डॉ. हेमंत सावरा व नरेश मस्के ही उपस्थित होते. आपला प्रश्न समजून घेतला.ह्या अगोदर सावरा साहेबांनी आपला विषय संसदेत मांडला आहे, आम्ही ह्याबाबत पाठपुरावा करू आणि तुम्हाचा प्रश्न लवकरात लवकर सोडवण्यासाठी आम्ही प्रयत्न करू असे चर्चे अंती श्रीकांत शिंदे यांनी सांगितले.
सदर शिष्टमंडळ नॅशनल फिशवर्कर्स फोरम (NFF)चे अध्यक्ष व MMKS कार्यध्यक्ष रामकृष्ण तांडेल यांच्या नेतृत्त्वाखाली,महाराष्ट्र मच्छिमार कृति समितीचे अध्यक्ष लिओ कोलासो,महाराष्ट्र राज्य मच्छिमार सहकारी संघाच्या अध्यक्षा ज्योती मेहेर, सदस्य जयकुमार भाय, भाटी मच्छिमार संस्थेचे चेअरमन राजीव कोळी, मढ मच्छिमार संस्थेचे संचालक प्रल्हाद खिचडे, वसई मच्छिमार संस्थेचे चेअरमन नाझरेथ गोडबोले, व्हा.चेअरमन अभय घाट्या, हरबादेवी पातवाडी संस्थेचे चेअरमन प्रमोद पाटील, अजित बोंबुल, डेनिस ज्यू रुपेश कोळी, अनिल कोळी, अलबट कोळी, उपस्थित होते.अशी माहिती किरण कोळी-सरचिटणीस यांनी दिली.


Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *