एसएमएस -प्रतिनिधी-सुरेश बोर्ले
पंजाब पोलिसांनी महाराष्ट्रातील नामवंत पैलवान सिकंदर शेख याला विना परवाना शस्त्र बाळगल्याप्रकरणी अटक केली आहे. प्राथमिक चौकशीत शेखचे राजस्थानमधील काही गँगस्टरशी संबंध असल्याचे उघड झाले आहे. पोलिसांकडून या शस्त्राचा गुन्ह्यात वापर झाला आहे का, याबाबत चौकशी सुरू आहे.
सध्या सिकंदर शेख पंजाब पोलिसांच्या ताब्यात असून त्याच्याकडून अधिक चौकशी घेतली जात आहे.
क्रीडा क्षेत्रात यापूर्वीही अशा घटना घडल्या आहेत. पंजाबमधील एका माजी आमदारास खूनप्रकरणी अटक, तर दिल्लीतील ऑलिम्पिक पदकविजेत्या पहलवानालाही मानवी वधप्रकरणी तुरुंगवास झालेला आहे.
या पार्श्वभूमीवर आता महाराष्ट्रातील पैलवान सिकंदर शेखच्या अटकेने क्रीडा वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. पुढील चौकशीत या प्रकरणाचे नेमके धागेदोरे लागतील, अशी माहिती पोलिस सूत्रांनी दिली आहे.
फार वाईट गोष्ट आहे कोणाला कसली भितीच राहली नाही
Shocking!!
पैलवान म्हटलं की पिळदार शरीरयष्टी डोळ्यासमोर येते.मात्र, सिकंदर शेखने एक सुसंस्कृत परंपरा नाही पूर्णपणे मोडकळीस आणली असून याची योग्य ती चौकशी करावी त्यात त्याला काही धोका आहे का! हे देखील तितकच महत्वाचं आहे…