प्रतिनिधी : सुरेश बोर्ले
मुंबई :मराठा आरक्षक आंदोलन नेते श्री.जरांगे पाटील हे गेल्या ५ दिवसांपासून आमरण उपोषणाला बसले होते.त्यांची तब्येत दिवसेंदिवस ढासळत होती.परंतु संपूर्ण महाराष्ट्रातून,आलेल्या आंदोलनांचे लोंढे व सरकारने हे आंदोलन चिरडण्यासाठी चारही बाजूंनी शर्थीचे केलेले प्रयत्न!ज्याला त्यांनी जुमानले नाही.पण वेळोवेळी पाटील साहेबांनी कडक शब्दात आंदोलकांना झापल्यामुळे,जास्त उद्रेक झाला नाही आणि सरकारने गठित केलेल्या समितीने!मराठा आरक्षण आंदोलनातील ८ पैकी ६ मागण्या बिनशर्त मान्य करून त्याचा GR ही काढून,त्याची एक प्रत जरांगे साहेबांना पेश केली व हैदराबाद तत्वे लागू केली जातील हा त्याधील महत्वाच मुद्दा आहे. शेवटी ह्याच समितीच्या उपाध्यक्षांच्या हस्ते सरबत ग्रहण करून,हे उपोषण पाटील साहेबांनी समाप्त केले.त्यावेळी जरांगेंच्याडोळ्यातून आनंदाश्रु बाहेर पडले. आंदोलकांनी गुलाल उधळत आनंदासहित हा विजय साजरा केला.मग जरांगे पाटील तडक औरंगाबादला निघून गेले.ह्या मराठा समाजाचा ऐतिहासिक लढा आणि
जरांगे पाटलांचे नाव सुवर्ण अक्षरात कोरले जाईल.मराठा समाज कोणतीही तमा न बाळगता खंबीर नेतृत्वाच्या मागे उभा राहिल्याने अनेक गुन्हे व पोलिस केसेस ही मागे घेण्यात आल्या.हा लढा महाराष्ट्रातील जनतेच्या कायम लक्षात राहील.
मोठ्या हॄदयाचा मानुस!salam