पोलिसांनी दिला ज्येष्ठ नागरिकाला तत्काळ न्याय

Share

एसएमएस -प्रतिनिधी -उत्कर्ष बोर्ले

मुंबई : गोरेगाव लिंक रोड येथील एसआरए प्रकल्पातील आपला हक्काचा फ्लॅट परत मिळवण्यासाठी वणवण भटकणाऱ्या एका 65 वर्षीय ज्येष्ठ नागरिकाला बांगुर नगर पोलिसांनी तत्काळ दिलासा दिला आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी त्वरित कारवाई करत संबंधित एजंटला बोलावून फ्लॅट खाली करण्याचे आदेश दिले, ज्यामुळे पीडित वृद्धाला मोठा आधार मिळाला आहे.

​ तक्रारदार हे अंदाजे 65 वर्षांचे ज्येष्ठ नागरिक असून ते सध्या ठाणे येथे वास्तव्यास आहेत. गोरेगाव लिंक रोडवरील देवी कन्याकुमारी एसआरए सहकारी गृहनिर्माण संस्थेत त्यांचा फ्लॅट  आहे. त्यांनी हा फ्लॅट अनिल हेवी डिपॉझिटवर भाड्याने दिला होता. सदर एजंटने मागील ५-६ महिन्यांपासून त्यांना फ्लॅटचे भाडे दिलेले नाही. इतकेच नव्हे तर, ज्येष्ठ नागरिकाला फ्लॅट परत हवा असताना तो खाली करण्यासही एजंटने नकार दिला. पीडित ज्येष्ठ नागरिक गंभीर आजारी असून त्यांना उपचारासाठी पैशांची गरज असताना ही परिस्थिती ओढवली होती. फ्लॅट खाली न करता एजंट त्यांची दिशाभूल करत होता.

​अखेरीस, हताश झालेल्या या ज्येष्ठ नागरिकाने बांगुर नगर पोलीस ठाणे गाठले आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र आव्हाड यांची भेट घेऊन आपली व्यथा मांडली. त्यांनी लेखी अर्ज सादर करून न्यायाची मागणी केली.

​या घटनेचे गांभीर्य आणि तक्रारदाराचे वय लक्षात घेऊन वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र आव्हाड यांनी तत्काळ दखल घेतली. पोलिसांनी त्वरित एनसी  नोंदवून संबंधित एजंटला पोलीस ठाण्यात पाचारण केले. पोलिसांनी कायद्याचा बडगा दाखवताच एजंटने फ्लॅट खाली करण्याचे मान्य केले. बांगुर नगर पोलिसांच्या या तत्पर भूमिकेमुळे ज्येष्ठ नागरिकाला वेळेवर न्याय मिळाला,


Share

One thought on “पोलिसांनी दिला ज्येष्ठ नागरिकाला तत्काळ न्याय

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *