
प्रतिनिधी :वैशाली महाडिक
मुंबई,गोरेगाव येथील साथी चंदू भाई मेहता समाज सेवा प्रतिष्ठान च्या फिनिक्स प्रकल्प अंतर्गत पोलीस निरीक्षक शैलाबी पठाण यांची मुलाखतिचा कार्यक्रम दिनांक रविवार 10 सप्टेंबर रोजी, सकाळी 10 वाजता केशव गोरे स्मारक ट्रस्ट, तीन डोंगरी, गोरेगाव पश्चिमेत आयोजीत करण्यात आला आहे.अतिशय प्रतिकूल परिस्थितीचा सामना करीत यशस्वी झालेली एक दमदार वाटचाल. अहमदनगर जिल्हातील राहुरी येथील शैलाबी पठाण या तरुणी अतिशय जिद्दीने पोलीस निरीक्षक झालेल्या आहेत. त्यांच्या या प्रेरणादायी प्रवासा चे पान उलघडण्यासाठी.मुलाखतीचा कार्यक्रम आयोजित केले आहे सामाजिक कर्यकर्ते राजेंद्र बहाळकर हे मुलाखतकार आहेत.कार्यक्रमाचे अध्यक्ष कार्यकारी विश्वस्त सुधीर देसाई आणि समन्वयक श्रावणी गीतांजली आहेत. विध्यार्थी आणि इतर सर्वांनी आवर्जून उपस्थित राहावे असे आवाहन आयोजकांनी केले आहे.