
एसएमएस.-प्रतिनिधी-उत्कर्ष बोर्ले
मुंबई :भारताच्या ७७व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त मालवणी येथील राष्ट्र सेवा दलाच्या कार्यालयात उत्साहात ध्वजारोहणाचा कार्यक्रम पार पडला. पालिकेचे ज्येष्ठ सफाई कर्मचारी रमेश परमार यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
या प्रसंगी उपस्थितांनी संविधानाला साक्ष ठेवून सद्भाव संकल्प घेतला. “आम्ही भारताचे नागरिक या नात्याने देशातील तसेच जगातील कोणत्याही व्यक्तीशी जात, धर्म, वर्ग, लिंग, भाषा, प्रदेश आदी कोणत्याही आधारावर भेदभाव करणार नाही. सर्वांशी समतेने व बंधुतेने वागू आणि देशाची एकात्मता व अखंडता जपू,” अशी शपथ यावेळी घेण्यात आली.
सद्भाव मंच व जनआंदोलनांचा राष्ट्रीय समन्वय यांच्या वतीने सद्भाव संकल्पाचे आवाहन करण्यात आले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत राष्ट्र सेवा दल, मालवणी काचपाडा तसेच सफल विकास वेलफेअर सोसायटीच्या कार्यकर्त्यांनी सद्भाव संकल्प केला.
खुप सुन्दर भारत माता कि जय
Congrats and happyrepublic day