प्रताप सरनाईक फाऊंडेशन आणि GM आयोजित नवरात्री उत्सवला उत्स्फूर्त प्रतिसाद..

Share

मुंबई : प्रताप सरनाईक फाऊंडेशन आणि GM यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित नवरात्री उत्सव २०२५ दरवर्षीप्रमाणे यंदाही दिमाखदार पद्धतीने पार पडला. महाराष्ट्र राज्य परिवहन मंत्री तथा धाराशिव जिल्हा पालकमंत्री आणि स्थानिक आमदार प्रताप इंदिराबाई बाबुराव सरनाईक यांच्या संकल्पनेतून आणि मार्गदर्शनाखाली हा भव्य उत्सव एमबीएमसी ग्राउंड, सेवन इलेवन शाळेजवळ, रामदेव पार्क येथे २२ सप्टेंबर ते १ ऑक्टोबर दरम्यान मोठ्या थाटामाटात पार पडला.
दहा दिवसांच्या या उत्सवात हजारोंच्या संख्येने नागरिकांनी सहभाग नोंदवत गरबा-दांडियाचा मनमुराद आनंद लुटला. सुप्रसिद्ध गरबा गुरु भावीन शास्त्री आणि त्यांच्या म्युझिकल टीमच्या लाईव्ह परफॉर्मन्सवर मीरा-भाईंदरकर बेभान होऊन रात्री उशिरापर्यंत गरब्याच्या तालावर थिरकले.
या उत्सवाची खासियत म्हणजे दररोज उत्कृष्ट गरबा सादर करणाऱ्या १० स्पर्धकांना GM मार्फत आकर्षक पारितोषिके देण्यात आली. अशा प्रकारे १० दिवसांत एकूण १०० विजेते निवडले गेले. या विजेत्यांपैकी शेवटच्या दिवशी झालेल्या भव्य सोहळ्यात रवी सोलंकी याने “GM नवरात्री सुपरस्टार” हा किताब पटकावला व दुबईला जाण्याचे गोल्डन तिकीट जिंकले.
वेगवेगळ्या वेशभूषा, उत्कृष्ट गरबा कौशल्य आणि रंगतदार सहभागामुळे महिला, पुरुष, बालक व जोडीदार या सर्व श्रेणींमधील स्पर्धा रंगतदार ठरल्या. नवरात्रीचा पारंपरिक उत्साह, आधुनिक साजसज्जा आणि सांस्कृतिक स्पर्धा यांचा संगम घडवत हा उत्सव मीरा-भाईंदरच्या सांस्कृतिक कॅलेंडरमधील एक भव्य पर्वणी ठरला.
या निमित्ताने महाराष्ट्र राज्य परिवहन मंत्री मा. ना. श्री. प्रताप इंदिराबाई बाबुराव सरनाईक म्हणाले की :
“नवरात्री हा आनंद, एकात्मता आणि भक्तीचा उत्सव आहे. दरवर्षी या उत्सवाच्या निमित्ताने मीरा-भाईंदरकर एकत्र येतात आणि आपल्या संस्कृतीला जपतात. इतक्या मोठ्या प्रमाणात नागरिकांनी सहभाग घेतल्यामुळे आमच्या मेहनतीला खऱ्या अर्थाने यश मिळाले. पुढील काळातही आम्ही अशा सांस्कृतिक उपक्रमांना प्रोत्साहन देत राहू.”


Share

3 thoughts on “प्रताप सरनाईक फाऊंडेशन आणि GM आयोजित नवरात्री उत्सवला उत्स्फूर्त प्रतिसाद..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *