प्रभादेवीत भाजपाचे जोरदार शक्ती प्रदर्शन?

Share

प्रतिनिधी:कांचन जांबोटी

मुंबई महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्ष मोर्चे बांधणी करत आहेत. मात्र भाजप यात आघाडीवर असून मुंबईतील प्रभादेवी येथे भाजपने दहीहंडी सराव शिबिराच्या माध्यमातून सोमवारी शक्तिप्रदर्शन केले. या सराव शिबिराला शेकडो कार्यकर्ते आणि हजारो गोविंदा सहभागी झाले होते. भाजपा मुंबईचे सचिव सचिन शिंदे यांनी या सराव शिबिराचे आयोजन केले होते.

मुंबईतील सण उत्सव आणि परंपरा जपण्यासाठी भाजपाच्या वतीने दादर प्रभादेवी परिसरात सातत्याने प्रयत्न केले जातात. दहीहंडी उत्सवाच्या निमित्ताने गोविंदा पथकांना सराव करता यावा यासाठी सराव शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. गोविंदा पथकांना उत्तेजन मिळावे म्हणून काही विशिष्ट रक्कम प्रोत्साहन म्हणून दिली जात होती.

गोविंदा पथकांचा विमा

मुंबईतील गोविंदा पथकांच्या सुरक्षेसाठी भाजपाच्या वतीने विमा सुरक्षा कवच प्रदान करण्यात येत आहे. यासाठी प्रत्येक गोविंदा पथकाचा सुमारे दहा लाख रुपयांचा विमा उतरवला जात आहे गोविंदा पथकांनी याचा लाभ घेण्यासाठी त्वरित आपली नावे नोंदवावीत असे आवाहन सचिन शिंदे यांनी केले आहे.

अभूतपूर्व प्रतिसाद — प्रसाद लाड

भाजपाच्या वतीने आयोजित केलेल्या या दहीहंडी सराव शिबिराला गोविंदा पथकांनी आणि कार्यकर्त्यांनी अभूतपूर्व प्रतिसाद नोंदवला. दादर प्रभादेवी वरळी या परिसराने नेहमीच सण परंपरा आणि उत्सव मोठ्या आनंदाने आणि भावुकतेने जपले आहेत. या सराव शिबिराला मिळालेल्या प्रचंड प्रतिसादामुळे सर्व प्रभादेवी ही उत्सवमय आणि परिसर भाजपामय झाल्याची प्रतिक्रिया भाजपा आमदार प्रसाद लाड यांनी यावेळी व्यक्त केली.


Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *