
file photo
प्रतिनिधी :मिलन शहा
दिल्ली विद्यापीठातील हिंदी विभागप्रमुख प्रा. डॉ. कुमुद शर्मा यांची वर्धा, महाराष्ट्र येथील महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठाच्या कुलगुरूपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
डॉ. कुमुद शर्मा या विद्यापीठाच्या पहिल्या महिला कुलगुरू असतील. सध्या प्रो. हनुमान प्रसाद शुक्ला येथे कार्यवाहक कुलगुरू म्हणून कार्यरत आहेत.