
एसएमएस -प्रतिनिधी -वैशाली महाडिक.
मुंबई :चारकोप सह्याद्रीनगर, रयत शिक्षण संस्थेच्या प्रा. डॉ. एन. डी. पाटील विद्यालय, सह्याद्रीनगर येथे आज झालेल्या माजी विद्यार्थी स्नेहमेळाव्यात शाळेच्या माजी विद्यार्थी संघाची औपचारिक स्थापना उत्साहपूर्ण वातावरणात करण्यात आली. या मेळाव्यास रायगड विभागाचे सहाय्यक विभागीय अधिकारी व विद्यालयाचे माजी शिक्षक विलासराव जगताप, स्थानिक स्कूल कमिटी सदस्य मदनराव चव्हाण तसेच माजी शिक्षक विकास गायकवाड, शामराव गायकवाड चंद्रकांत शिंदे, उत्तम शिंदे, विलास लेंभे, नारायण बिचुकले,अशोककुमार गरुड, शारदा भोईटे, वेदपाठक, उज्ज्वला जगताप, सरिता शिंदे, विनोद घाटगे, के. जी. जगताप, देशमुख आदी मान्यवर उपस्थित होते.
मेळाव्यात झालेल्या चर्चेनंतर प्रा. संदीप पिसाळ यांची अध्यक्षपदी, कु. सिद्धीका शिंदे यांची उपाध्यक्षपदी आणि निखिल चव्हाण यांची कोषाध्यक्षपदी सर्वानुमते निवड करण्यात आली. या प्रमुख पदांसह एकूण 15 सदस्यीय कार्यकारिणीची घोषणा करण्यात आली. तसेच मुख्याध्यापिका शिल्पा जरे या संघाच्या सचिवपदी कार्यभार सांभाळणार असल्याची माहिती देण्यात आली.
मेळाव्याचे प्रास्ताविक करताना शिल्पा जरे यांनी उपस्थितांचे स्वागत केले. या प्रसंगी माजी विद्यार्थी आणि माजी शिक्षकांनी आपल्या शालेय आठवणींना उजाळा देत मनोगत व्यक्त केले. विलासराव जगताप यांनी माजी विद्यार्थ्यांना शाळेच्या सर्वांगीण विकासासाठी पुढाकार घेण्याचे आणि आपल्या क्षेत्रातील ज्ञान विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याचे आवाहन केले. तर श्री. मदनराव चव्हाण यांनी विद्यार्थ्यांनी शाळेशी सातत्याने संपर्क ठेवावा असे सांगितले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक उमाकांत जगताप यांनी केले.

Congrats