
प्रतिनिधी :वैशाली महाडिक
मुंबई : मालाड पूर्वेतील रहिवासी प्रेमनाथ गणू ठोंबरे यांना राज्य स्तरीय उद्योग रत्न पुरस्कार तसेच मी उद्योजक होणारच या संस्थेच्या मार्फत उद्योजक पुरस्कार.भोवडे गावचे सुपुत्र तसेच वन सोर्स सर्व्हिस कंपनीचे मालक आणि कुणबी चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज-महाराष्ट्र राज्य अध्यक्ष प्रेमनाथ गणू ठोंबरे अतिशय खडतर जीवनप्रवासातुन नोकरी करत असतांना त्यांना ६० अधीक पुरस्कार मिळाले, तसेच सामाजिक संघटनांकडून १३ पुरस्कार मिळाले आहेत , उद्योग क्षेत्रातून ६ पुरस्कार मिळाले असून ११ ऑक्टोबर २०२५ रोजी राज्यस्तरीय उद्योग भूषण पुरस्कार आणि १४ ऑक्टोबर २०२५ रोजी मी उद्योजक होणारच या संस्थेमार्फत उद्योजक पुरस्कार प्रदान करण्यात आला. ठोंबरे यांनी अतिशय खडतर जीवनप्रवास करून त्यांचा नोकरीतील प्रवास मुंबईतील नामांकित कंपनी तसेच अमेरिकन कंपनीत अशी एकूण त्यांनी २२ वर्ष काम केले. सुरुवात रेकॉर्ड क्लार्क म्हणून केली आणि शेवट ग्रुप जनरल मॅनेजर म्हणून नोकरीला स्वल्पविराम दिला. २०१० पासून वन सोर्स सर्व्हिस कंपनीची सुरुवात करून आज मुंबईत यशस्वी उद्योजक म्हणून गेली १५ वर्ष काम करत आहेत. या कालावधीत अनेक
शाळांना, सामाजिक संस्थाना तसेच अनेक आश्रम यांना मदत केली आणि करत आहेत. आज सामाजिक कार्यात त्यांचा सिंहाचा वाटा आहे.

आपली किर्ति सर्व जगात पसरावी हिच ईश्वर चरणी प्रार्थना
Congratulations
Congrats