
प्रतिनिधी :मिलन शहा
देवेंद्र यांनी गुरुवारी दि.5 डिसेंबररोजी,तिसऱ्यांदा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. त्यांच्यासोबत शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ शिंदे आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली.याप्रसंगी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी तिन्ही नेत्यांचे अभिनंदन केले.तसेच महायुती सरकारच्या चांगल्या निर्णयांना मनसे पाठिंबा देणार असल्याचेही जाहीर केले. राज ठाकरे यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म द्वारे माहिती दिली.