
प्रतिनिधी :मिलन शहा
मुंबई,मालाड पश्चिमेतील मालवणी क्र. 3 येथे व्हाय व्ही केअरआणि सफल विकास वेलफेअर सोसायटी च्या वतीने आयोजित कोन बनेगा स्पर्धेत फरीदा शेख बनल्या केबिव्हीसी शेफ या स्पर्धेत 46महिलांनी गाठली होती अंतिम फेरी. दिनांक 15 ते 21 डिसेंबर2024, दरम्यान चार टप्प्यात ही स्पर्धा पार पडली जवळपास दोनशे स्पर्धक सहभागी झाले विशेष म्हणजे ही स्पर्धा सर्वांसाठी खुली होती यात 13 वर्षीय चिमुकल्या पासून 72 वर्षीय आजी सहभागी झाले तसेच तीन पुरुषांचा ही यात समावेश होता. फरीदा शेख यांनी केबीव्हीसी विजेता पद पटकवात दहा हजार रोख रक्कम , ट्रॉफी, मुकुट च्या मानकरी ठरल्या तर महाजबीन यांनी दुसरा क्रमांक पटकावून पाच हजार ट्रॉफी, मुकुट मिळवले. तसेच रिया कोळी यांना तिसरा क्रमांक मिळवून रोख चार हजार आणि ट्रॉफी चार मिळवले. तसेच चार स्पर्धाकांना प्रत्येकी अडीच हजार चे रोख बक्षीस व प्रशस्ती पत्र देण्यात आले. तसेच पहिल्या फेरीतुन अंतिम फेरी गाठणाऱ्या 46 महिलांना प्रत्येकी पाच शे रोखआणि प्रशस्ती पत्र देण्यात आले. या स्पर्धेत पर्यवेक्षक म्हणून मनीषा क्षीरसागर, मनोज मोरे आणि शुभदा पुरव यांनी कुशलतेने जवाबदारी पार पाडली.तसेच अंतिम फेरीत इवोन, वेनेसा, डॉ. शारंग वर्टिकर यांनी जवाबदारी पार पाडली. तसेच कार्यकर्त्यांना ही प्रशस्ती पत्र देण्यात आले.अशी माहिती आयोजक वैशाली महाडिक आणि विग्नेश मंजेश्वर यांनी दिली