फुलांचे आंदण “कास पठार”!

Share


प्रतिनिधी:सुरेश बोरले

आपला महाराष्ट्र हा अनेक सौंदर्याने नटलेला आहे. अनेक गडकिल्ले,थंड हवेची ठिकाणे, इतिहसिक असा वारसा पण महाराष्ट्राने जपलेला आहे.पण विशेष मौसमात येथे फुलांची बरसातही होते.हा फुलांचा पडणारा पाऊस!आपल्याला इतिहासिक राजधानी सातारा येथे विस्तृत “कास” पठारावर पहायला मिळते. साधरणपणे जुन ते सप्टेंबर महिन्यापर्यंत येथील पठारावर ही विविध अमाप नैसर्गिक फुले उगवतात.संपूर्ण पठार ह्या फुलांनी खुलून जाते.ती फुले पहायला येथे पर्यटकांची गर्दी होत असते.संपूर्ण महाराष्ट्रातून येथे मिकी माऊस,तेरडा,जंगली आले अशी अनेक फुले पाहण्यासाठी ते येत असतात.अतिशय सुखद व प्रदूषणरहित हवामान आणि त्यामधे नटलेले फुलांचे सौंदर्य हा दुग्ध शर्करा योग आहे.हे सलग पाहून झाल्यावर कांहीं अंतरावरच “हेरिटेज वाडी” विश्रांती गृह आहे.येथे राहण्याचा व पोहण्याचा मनसोक्त आनंद घेऊन, गरमा गरम चहा नाश्ता जेवणाचा आनंद घेऊन ह्या सहलीचा शेवट गोड करू शकता.कास पठारावर जाण्यासाठी,आपण सातारा पोवई नाका येथून सरळ कास मार्गाने,येथे येऊ शकता.सफल महाराष्ट्र समाचारच्या प्रतिनिधींनी तेथे भेट दिली.


Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *