एसएमएस डेस्क:सामान्य कार्यकर्त्यांची व्यथा!!
सोशल मीडियावर व्हायरल सामान्य शिवसैनिकांची व्यथा..
*शिंदे साहेब मी व आपण सगळे शिवसेनेचे मावळे आहोत.आज जो तुम्हाला त्रास होतोय की आम्हाला उद्धव साहेबांच्या अवती बडवे आहेत ते साहेबांना भेटून देत नाही अजून तुमचे काही मुद्दे आहेत जे तुम्ही मांडले. हेच आम्हा सारख्या सामान्य शिवसैनिकांना,(कार्यकर्त्याना) या सर्व बाबींचा सामना करावा लागतो. मग आम्ही काय करायचं ?? कोणाकडे दाद मागायची?? आम्ही मेहनतीने पक्षाची कामे करायची आणि पद कोणाला ज्याच्या कडे पैसा आहे त्यांना असं का.?*
मी शाखाप्रमुख पदावर असुन पण आम्ही आपल्या सारख्या नेत्यांना किंवा जिल्हा प्रमुख किंवा तालुका प्रमुख ह्यांना आमच्या विभागातील शाखेतील काही समस्या मांडण्यासाठी डायरेक्ट संभाषण करू शकत नाही. आम्हाला पण तेच उत्तर मिळतं साहेब बिझी आहेत नंतर…आम्हाला ही लोकांच्या समस्या आहेत त्या तुमच्या पर्यन्त पोहोचवायच्या असतात. पण आम्हाला ही तुमच्या अवती भवती असणाऱ्या बडव्यांकडून तारीख मिळते.आम्हाला कुठल्याही प्रकारच्या मिळकतीची कामे मिळत नाही ती सर्व आपल्या जवळील बडव्यांना मिळतात PA CA यांना मिळतात मग आम्ही काय फक्त झेंडा 🚩 घेऊन मागे पुढे फिरायचे निवडणुकीत प्रचार करायचा का ?? आज अशी परिस्थिती आहे की आम्हाला साधा बॅनर लावणेही शक्य होत नाही. आम्ही आमचे कामधंदे सोडून सर्व मिटिंग, आंदोलने,मोर्चे यात सहभाग घायचा.आणि काही कारणास्तव नाही येऊ शकलो तर.आम्हांला PA CA ची बोलणी ऐकावी लागतात. हे आम्ही कसं सहन करतो ते आमचे आम्हाला माहीत आहे पण तुम्ही आता अशीच कारणे सांगून बंडखोरी केली पण हे आम्ही किती वर्षां पासून सहन करतोय. ह्यासर्वांमुळे आम्ही काय साधं बंड करायचे ठरवले तरी आमची हाकलपट्टी होईल कारण आम्ही ना नगरसेवक,ना आमदार, ना खासदार आम्ही आहेत ते साधे हाडांमासाचे कट्टर शिवसैनिक ते कुठे जाणार नाही हे तुम्हाला पक्के माहित आहे त्यामुळे तुम्हाला आमची परवा नसते.
साहेब आज मी खुप जुना कार्यकर्ता,शिवसैनिक बालवयाच्या 15 व्या वर्षा पासून शिवसेनेत कार्यरत आहे आजपर्यंत मला पक्षात 30 वर्ष झाली आणि आजही माझा संपूर्ण परिवार पक्षाकडून काहीही आर्थिक किंवा अन्य फायदा न घेता एकनिष्ठ आहे. आज माझ्या विभागात कोणत्याही निवडणुकीत तिकिटाची मागणी केली तर आम्हाला दुजाभाव मिळत आला आहे आमच्या मागून किती सेनेत आले तिकीट घेऊन जिंकले, हारले आणि फायद्यासाठी परत पक्ष सोडून गेले आम्ही तिथेच आहेत पण का ?? तर आमच्याकडे पैसा नाही म्हणुन..आज तिकीट पैसा बघून दिले जाते निष्ठा म्हणून नाही .मला हे सगळं बोलायच नव्हते पण आजची परिस्थिती पाहता तुमच्या सारख्या वरिष्ठाना सर्व मिळून सुद्धा ह्या केलेल्या बंडखोरीची आम्हा साध्य शिवसैनिकांना खूप खंत वाटत आहे.तुम्हाला तर पक्षाने काय नाही दिले ते बोला.. ?? मग आमच्या सारख्या समान्य शिवसैनिकांनी काय करायचे? आज असे सुरू आहे जो झूकून पाया पडतो तोच मोठा होतो. पण तेच मी कधी केलं ना भविष्यात करणार कारण मी एक स्वाभिमानी शिवसैनिक आहे आणि राहणार 🙏🏻मी आजही झुकतो तो फक्त वंदनीय हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे ह्यांच्या चरणी आणि वंदनीय, पूज्य, आमचे प्रेरणास्थान, गुरुवर्य, धर्मवीर आंनद दिघे साहेब ह्यांच्या चरणी…
साहेब माझी तुम्हाला एकच विनंती आहे 🙏तुम्ही काय आणि उद्धवजी साहेब काय माझ्यासाठी तुम्ही सर्व वंदनीय आहेत.मी जे काही ह्या लेखात बोललो ते आजच्या परिस्थितीला अनुसरून बोललो आहे.आम्हाला अशी खदखद,खंत,खालच्या दर्जाची वागणूक, जिल्हा प्रमुख,मतदार संघातील आमदार, खासदार व नगरसेवकांना भेटू न देणे वगैरे वगैरे असे गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहे पण आम्ही पक्ष सोडण्याचा विचार कधी मनात आणला नाही आणि आणणारही नाही कारण आम्ही सर्व बाळासाहेबांचे व दिघेसाहेबांच्या विचारांचे कट्टर व कडवे शिवसैनिक आहोत आणि राहणार एवढी ग्वाही ह्यानिमिताने देतो.जास्त काही चुकीचे बोललो असेल तर क्षमस्व:🙏🏻पण तुम्ही आणि आणि माझ्या पक्ष श्रेष्ठीने ह्यापुढे पाहिले तळागाळातील साधा शिवसैनिक जपावा कारण शिवसैनिक कधी फुटत नाही फुटतो तो पदाधिकारी म्हणून त्याचा योग्य तो सन्मान झालाच पाहिजे ही नम्र विनंती करतो
जय हिंद 🇮🇳 जय महाराष्ट्र 🚩