एसएमएस -प्रतिनिधी-वैशाली महाडिक
मुंबई : उत्तरदायित्व फाउंडेशन यांच्या वतीने महात्मा ज्योतीराव फुले राजश्री शाहू महाराज आणि डॉ. बी. आर. आंबेडकर यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त ‘उत्तरदायित्व’ वार्षिक अंक २०२६ प्रकाशित करण्याचे ठरविण्यात आले आहे. या विशेष अंकासाठी ‘बंड’ या विषयावर आधारित लघुकथा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
स्पर्धेसाठी कथांची शब्दमर्यादा ३०० ते ४०० शब्द इतकी निश्चित करण्यात आली आहे. कथा पूर्णपणे स्वलिखित असावी आणि लेखकाने त्याबाबत स्वाक्षरीसह प्रमाणपत्र जोडणे आवश्यक आहे. इच्छुक लेखकांनी आपली कथा १५ मार्च २०२६ पर्यंत संपादकीय पत्त्यावर पाठवावी, असे आवाहन कार्यकारी संपादक शंकर बळी यांनी केले आहे.
या स्पर्धेत निवड झालेल्या सर्वोत्कृष्ट पाच कथांना पारितोषिके देण्यात येणार असून त्या कथांना ‘उत्तरदायित्व’च्या विशेष अंकात स्थान दिले जाणार आहे. स्पर्धेला भरघोस प्रतिसाद मिळाल्यास निवडक कथांचे स्वतंत्र पुस्तक प्रकाशित करण्यात येईल, अशी माहिती फाउंडेशनचे रमेश मोहिते यांनी दिली.
अधिक माहितीसाठी संपर्क :
शंकर बळी – ९८६९९११२०४
राजू गडहिरे – ९८५०६३८०३४
महात्मा ज्योतीराव फुले राजश्री शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर या थोरावंतावर लिखान करण्या करिता एक जन्म कमी पडेल असे थोरवंत आहे
छान उपक्रम
Ohh gd