बक्षीस वितरण व गुणवंत शिक्षक पुरस्कार सोहळा उत्साहात संपन्न…

Share

एसएमएस -प्रतिनिधी -वैशाली महाडिक

महानगरपालिका शिक्षण विभागाच्या खाजगी प्राथमिक शाळा विभाग (RN, RC, RS, PN, PS, N, S, T) अंतर्गत येणाऱ्या शाळांचा ‘वार्षिक बक्षीस वितरण व गुणवंत शिक्षक पुरस्कार सोहळा’ दिनांक ७ एप्रिल २०२६ रोजी गोरेगाव येथील डॉ. भानुमेन नानावटी कलाधर, नंदादीप विद्यालय येथे मोठ्या उत्साहात आणि दिमाखात पार पडला.

या सोहळ्यात खाजगी प्राथमिक अनुदानित विभागातून ‘गुणवंत शिक्षक पुरस्कार’ हा मानाचा सन्मान एकवीरा ज्ञान प्रसारक मंडळाच्या रवींद्र बाल विद्यानिकेतन मराठी शाळा, चारकोप कांदिवली  येथील प्राथमिक विभागातील शिक्षिका  रश्मी भूषण रूमडे यांना प्रदान करण्यात आला. त्यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल सर्वत्र अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

पुरस्कार स्वीकृत करताना भावना व्यक्त करताना  रूमडे म्हणाल्या, “मला शालेय कामकाजाचे अमूल्य मार्गदर्शन या शाळेच्या माजी मुख्याध्यापिका  मनिषा शिर्के  यांच्याकडून सातत्याने मिळत राहिले. तसेच विद्यार्थ्यांसाठी निष्ठेने कार्य करण्याची प्रेरणा मला माझ्या सासूबाईंकडून मिळाली. त्याबद्दल मी त्यांची मनःपूर्वक आभारी आहे.”

या पुरस्कारासाठी एकूण २५ शिक्षकांची विविध निकषांच्या आधारे निवड करण्यात आली. शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय योगदान आणि विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या गुणवत्तापूर्ण शिक्षणाची दखल घेऊन हा सन्मान प्रदान करण्यात आला.

कार्यक्रमास विभाग निरीक्षिका  भारती भवारी  तसेच विभाग निरीक्षक  मोहम्मद शाह  यांची प्रमुख उपस्थिती होती.एकवीरा ज्ञानप्रसारक मंडळाच्या संस्थेचे संस्थापक, संचालक मंडळ, सर्व मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व पालक यांच्या वतीने  रश्मी भूषण रूमडे यांचे अभिनंदन करण्यात आले असून त्यांच्या पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या.


Share

One thought on “बक्षीस वितरण व गुणवंत शिक्षक पुरस्कार सोहळा उत्साहात संपन्न…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *