बच्चू कडू यांचे शेतकरी आंदोलन प्रखरतेकडे!

Share

एसएमएस -प्रतिनिधी –सुरेश बोर्ले

नागपूर : एक सच्चा, निर्भीड आणि प्रामाणिक समाजसेवक म्हणून ओळख असलेले मा. बच्चू कडू यांनी शेतकऱ्यांच्या समस्या आणि सरकारकडून होत असलेल्या फसवणुकीच्या विरोधात नागपूर येथे तीव्र आंदोलन छेडले आहे.

या आंदोलनामुळे नागपूर परिसरातील द्रुतगती मार्गावर चक्काजाम होण्याची शक्यता वाढली असून येणाऱ्या काही दिवसांत आंदोलन अधिक तीव्र होण्याचे संकेत दिसत आहेत.

बच्चू कडू यांनी माध्यमांशी बोलताना स्पष्ट शब्दांत इशारा दिला की —

“सरकारने जर बळीराजाच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष केले, तर आम्ही फक्त रस्तेच नाही तर रेल्वे आणि गरज भासल्यास विमानतळही अडवू!”

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बच्चू कडू यांना चर्चेसाठी मुंबईत बोलावले असले तरी त्यांनी बैठकीला न जाण्याचा निर्णय घेतला आहे.
त्यांच्या म्हणण्यानुसार —

“आंदोलन सुरू असताना काही अघटित घडल्यास त्याची जबाबदारी कोण घेणार?”

दरम्यान, राज्यातील इतर अनेक शेतकरी नेते आणि संघटनाही या आंदोलनाला पाठिंबा देत आहेत.
बळीराजाच्या न्याय्य मागण्या त्वरित मान्य करून सरकारने शेतकऱ्यांच्या समस्या सोडवाव्यात, हीच बच्चू कडू आणि सर्व आंदोलकांची एकमुखी मागणी आहे.


Share

4 thoughts on “बच्चू कडू यांचे शेतकरी आंदोलन प्रखरतेकडे!

  1. बच्चू भाऊ कडू आंदोलन यशस्वी केल्या शिवाय राहणार नाहीत…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *