बनारस स्थानकाचा स्टेशन कोड बदल्याने प्रवासी त्रस्त.

Share

एसएमएस -प्रतिनिधी -मिलन शहा.

मुंबई : रेल्वेच्या भोंगळ कारभारचा फटका प्रवाशांना बसत असून नुकतेच बनारस रेल्वे स्टेशनचा स्टेशन कोड नंबर बदलल्याने प्रवाशांना नाहक त्रास झाला. रेल्वेच्या या बदलाची कल्पना प्रवाशांना नसल्याने त्यांचे नुकसानही झाले. प्रवाशांचे झालेले नुकसान रेल्वे कधी व कसे भरून देणार, असा प्रश्न मुंबई काँग्रेस अध्यक्ष खासदार वर्षा गायकवाड यांनी विचारला आहे.

लोकसभेत विचारलेल्या प्रश्नावेळी खासदार वर्षा गायकवाड म्हणाल्या की, बनारस रेल्वे स्थानकाचा स्टेशन कोड ‘BSBS’ वरून ‘BNRS’ बदलल्यामुळे रेल्वे प्रवाशांना त्रास झाला. याबदलामुळे ३० नोव्हेंबर ते १ डिसेंबर या दरम्यान मुंबईतील आरक्षण प्रणाली विस्कळीत झाली होती, यामुळे तिकीट आरक्षण आणि इतर सेवांवर परिणाम झाला आणि प्रवाशांना गैरसोयीचा सामना करावा लागला. जेव्हा एखादा बदल केला जातो तेव्हा त्याचा परिणाम संपूर्ण व्यवस्थेवर होतो, त्यामुळे येत्या काळात तुम्ही यावर काय कारवाई करणार याची माहिती रेल्वे मंत्र्यांनी द्यावी व नुकसान भरपाईचे काय असे खासदार वर्षा गायकवाड यांनी विचारले.
झालेल्या घटनेची माहिती घेऊन खासदार वर्षा गायकवाड यांनी कळवले जाईल असे उत्तर रेल्वे मंत्री अश्विनीकुमार यांनी दिले.


Share

3 thoughts on “बनारस स्थानकाचा स्टेशन कोड बदल्याने प्रवासी त्रस्त.

  1. घाई घाईत केलेले काम असच असत या लोकाना जनतेचे होणारे हाल दिसत नाही चौकशी करतो आणि मग बोलतो अस बोलायचे मग काय थोडया दिवसात जनता सर्व विसरुन जाते नंतर कोणी हि आवाज उठवत नाही

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *