प्रतिनिधी : सुरेश बोर्ले
क्रिकेट : सध्या दुबई येथे आशियाई कप २०२५ ची रंगत वाढत आहे. संपूर्ण स्पर्धेत भारतीय संघ अजूनपर्यंत अपराजित आहे. काल भारतीय संघाने बांगलादेश संघाचा धुव्वा उडवत!शानदार अंतिम फेरीत प्रवेश केला.उत्कृष्ट चार संघातून,भारतीय पहिला संघ अंतिम फेरीत दाखल झाला आहे.तर पुढील सामना हा पाकिस्तान व बंगला देश संघात होणार असून,ह्या सामन्यात जो संघ जिंकेल!तो अंतिम सामन्यात भारताशी झुंझेल.पुन्हा एकदा अभिषेक शर्मा व शुभमन गिलने,भारताला चांगली सुरुवात करून दिली.अभिषेकच्या ७५ धावा हार्दिक पांड्या ३८ तर गिलने २९ धावांचं योगदान भारतीय संघासाठी दिलं.तर बांगलादेशने फलंदाजी करताना २० षटकात फक्त १२७ च धावा केल्या.त्यामध्ये सैफच्या ६९ धावा व इमोन च्या २१ धावा होत्या.पण भारतीय गोलंदाजांनी चांगली गोलंदाजी करत,बांगला देशला फक्त १२७ धावांत गुंडाळून सामना आपल्या खिशात घातला.भारताच १६८ धावांचं लक्ष मात्र बांगलादेशला गाठता आलं नाही.
Good
Good