
प्रतिनिधी :वैशाली महाडिक
मुंबई,आंतरभरती अनुवाद सुविधा केंद्रा च्या वतीने बाळशास्त्री जांभेकर अनुवाद पुरस्कार 2023 जाहीर करण्यात आला आहे. हा पुरस्कार अंबरीश मिश्रा यांना त्यांच्या “दिडदा दिडदा ” या 2022 सालातील पुरस्कार प्राप्त ग्रंथासाठी जाहीर करण्यात आला आहे. शुक्रवार दि.27 ऑक्टोबर रोजी संध्याकाळी 6.30 वाजता गोरेगाव पश्चिमेतील केशव गोरेगाव स्मारक ट्रस्ट च्या सभागृहात रामदास भटकळ यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.प्रसंगी वक्ते अमरेंद्र नंदू धनेश्वर असणार आहेत. जास्तीत जास्त साहित्य प्रेमीन्नी या पुरस्कार सोहळ्यात उपस्थित राहावे असे आवाहन साने गुरुजी स्मारक ट्रस्ट, आंतर भारती अनुवाद सुविधा केंद्राच्या वतीने करण्यात आली आहे.