बेस्टचे खाजगीकरण थांबवा.

Share

प्रतिनिधी : वैशाली महाडिक

.मुंबई : बेस्टचे खाजगीकरण थांबवा सार्वजनिक वाहतूक सेवा म्हणून पुनर्गठीत करा व बेस्ट संबंधित इतर विविध मागण्यासाठी विविध सामाजिक संघटनांनी, आमची मुंबई आमची बस या अभियाना अंतर्गत, मुंबईतील  20 ठिकाणी आज जनजागृती कार्यक्रम करण्यात आले. 

याच अभियाना अंतर्गत मुंबईत बोरीवली पश्चिम परिसरात मूलभूत अधिकाऱ संघर्ष समिती (मास ) व ह्युमनिस्ट सेंटर या संघटनांच्या वतीने जनजागृती मोहीम राबवून स्थानिक नागरिकांशी संवाद साधण्याबरोबरच त्यांना माहिती पत्रके देण्यात आली.त्यानंतर शिष्टमंडळाने  बेस्टच्या गोराई व मागाठाणे डेपोला भेट देऊन डेपो व्यवस्थापकांशी चर्चा करून त्यांना विविध मागण्याचे निवेदन दिले. 

 स्थानिक काँग्रेस नेत्या व माजी नगरसेविका शीतल म्हात्रे व जनता दल (सेक्युलर ) मुंबई अध्यक्ष प्रभाकर नारकर तसेच दिनेश राणे, शरथ सॅलियन, रमेश बोरीचा, संजय पावसकर, जगनारायण, कुलीन रायचुरा, नॉरीन, प्रकाश जानवलकर, कॅसेंड्रा वेगास, ग्लेंडा अल्मेडा, डॉ विकास निकम, बिंटूस सोरस व अन्य कार्यकर्ते यात सहभागी झाले होते.


Share

2 thoughts on “बेस्टचे खाजगीकरण थांबवा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *