लेखक :सुरेश बोर्ले
काही दिवसांनपूर्वी ठाकरे बंधू एकत्रित आल्याचा मोठा कार्यक्रम वरळी येथे पार पडला.मुंबईत परप्रांतीयांबरोबर हिंदी मराठी विषयी वाद झाले.ते अजूनही होतच आहेत.मराठी अस्मिता राखण्यासाठी,विशेष मनसे पक्षाने पाऊले उचलली!त्या मुद्द्यावर दोन्ही भाऊ एकत्र आले.असे वाटले होते की मराठी अस्तित्वाला आता चालना मिळेल?भूमिपुत्रांनी केलेली गर्दी पाहून आता कैवारी सापडले!हे स्मितहास्य प्रत्येक मराठी माणसांच्या चेहऱ्यावर होत.पण मराठी माणूस केव्हा आपसात घात करील ह्याचा नेम नाही. फितुरी व बंडाळी ही मराठ्यांच्या पाचवीला पूजलेलीच आहे. म्हणून तर संभाजी राजे हे अशा कृतीला बळी पडले व महाराष्ट्रने छत्रपती शिवरायानंतर धर्मरक्षक गमावला!नाहीतर महाराष्ट्राचा इतिहास काहीं औरच असता. बर ज्यांनी दगाबाजी केली,त्यांना जहागिरि किंवा राज्य मिळाले का?नाही! त्यांचाही नायनाट मोघलांनीच केला.म्हणून मराठी भूमिपुत्रांना हा शाप आहे.ते स्वतःकधी वर येणार नाहीत व दुसऱ्याला कधी वर येऊं देणार नाहीत.आत्ताचे ताजे उदाहरण घ्या ना !बेस्ट कामगार सोसायटी निवडणुकीत मा.उद्धवजी ठाकरे व राज ठाकरे ह्यांनी एकत्रितपणे निवडणुकीत भाग घेतला.परंतु बहु मराठी भाषिक कर्मचारी व कामगारांनी त्यांना अक्षरशा नाकारले.एकही उमेदवार ठाकरे बंधूंचा निवडून आला नाही. अनेक वर्षे ही सोसायटी सेनेच्या ताब्यात होती.पण ह्या पॅनलच्या उमेदवारांनी अमाप भ्रष्टाचार केलेला आहे!असा आरोप त्यांच्यावर आहे.अहो ह्या राजकारणात असले आरोप हे होतच असतात.येथे कुणीही धुतलेल्या तांदळा सारखे स्वच्छ नाहीत.मग येणारे दुसरे भ्रष्टाचारी नसतील हे कशावरून?आज ह्या पराभवाने भूमिपुत्रांनी आपल्या पायावरच धोंडा पाडून घेतलेला आहे. काही अत्याचार झाला की, मनसे शिवसेना पाहिजे. पण निवड करताना मराठ्यांनी मात्र गद्दारी करायची,ही एक प्रकारची फितुरीच आहे. भ्रष्टाचारी फक्त ह्याच पक्षात आहेत का? निवडून आलेले कमी असतील का?हा संशय जनतेत आहेच?विनाकारण ह्याला गालबोट मराठी माणसांनीच लावलेलं आहे.ह्याचे पडसाद येणाऱ्या!महापालिका निवडणुकीत दिसतीलच.पुन्हा एकदा ठाकरे बंधूंची पकड ढिली पडल्यावर,परप्रांतीय मुजोर होणार आहेत.अशा निकालाने त्यांना खतपाणी घालणारे सत्ताधारी आणखीन माझतील. हिंदुत्वाच्या नावाखाली भूमिपुत्रांना संपवण्याची संधी!आपणच त्यांना दिलेली आहे. ह्याचे मोठे परिणाम भोगण्याची आता तयारी ठेवा!हेच परप्रांतीय मुंबईमे अभी मराठी नही मारवाडी बोलनेका,गुजराती बोलनेका!अशी सक्ती करतील. ही पाळी आपणच आणलेली आहे. ह्याला सर्वस्वी भूमिपुत्रच जबाबदार आहे.असे जनमत आहे.
बरोबर मते दुसर्यननाआणि प्रश्न सोड़वायला मात्र मनसे,शिवसेना
Marathi manus should think on this
Makes you think