बेस्ट बस भाडेवाढ मुंबईकरांच्या खिशावर परिणाम:काँग्रेस प्रवक्ता.

Share

File Photo

प्रतिनिधी :मिलन शहा

बेस्ट बस भाडेवाढ झाल्यास अगोदरच महागाईने होरपळलेल्या मुंबईकरांच्या खिशावर मोठा भार पडणार आहे. सर्वसामान्य मुंबईकर, नागरिक रिक्षा, टॅक्सी अशा खासगी वाहनांऐवजी माफक दरात वाहतूक सेवा पुरवणाऱ्या बेस्ट बसने प्रवास करतात. मुंबईत असलेल्या शेअर रिक्षा आणि टॅक्सीचे भाडे सर्वसामान्य नागरिकांना, गरीब वर्गाला परवडत नाही. त्यामुळे तासनतास बसच्या रांगेत उभे राहून प्रवास करणाऱ्या नागरिकांना आता बेस्ट बसच्या तिकीटाच्या दरात दुप्पटीने वाढ झाल्यास मोठा फटका बसणार आहे. त्यामुळे प्रशासनाने केलेल्या दरवाढीला काँग्रेसचा विरोध असून त्यांनी ही दरवाढ तात्काळ मागे घ्यावी व सर्वसामान्य मुंबईकरांना, मुंबईतील गरीब, माध्यमावर्गीय जनतेला दिलासा द्यावं.


Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *