प्रतिनिधी:सुरेश बोरले

मुंबई,मुंबईच्या बोरिवली(प) स्टेशन परिसरात,साधारणपणे दुपारी 3 नंतर ,मोक्ष प्लाझा किंवा कोर्ट चंबर इमारती पर्यंत, अगदी सुनसान असालेला रस्ता हा अचानक मोठे मोठे बोझे घेऊन रस्त्यावर फेरीवाले आपल्या बापाचाच रस्ता समजून दुकान सझवतात.लोकांना दुचाकी लावण्या सुद्धा अक्षरशः जागा शोधावी लागते किंवा जाता येताना, तारेवरची कसरत करावी लागते. मोक्ष प्लाजा,कोर्ट चेंबर ते स्टेशन ह्या दरम्यान दोन्ही रस्त्याकडचे बस स्टॉप फेरीवाल्यामध्ये आहेत की, फेरीवाल्यांचे मालकीचे बस स्टॉप आहेत हेच कळत नाही.हा रस्ता अक्षरशः अर्धा अधिक त्यांनी व्यापलेला असतो.माणसं काय करणार?ह्या जमेल्यातन,बिचारे रस्ता काढत असतात.ही कुणाची मेहेरबानी व पुण्याई आहे.महा पलिकेचीच ना? त्यांच्या स्वार्थाशिवाय हे शक्य आहे का? अजून महापालिकेला मुंबई किती बकाल करायची आहे?किती परप्रांतीयांचे लाड पुरवायचे आहेत. ह्याला काही मर्यादा!संध्याकाळी थकून भागून माणूस घरी येत असतो आणि हे फेरीवाले हा मोठा अडथळा त्यांना ठरतो.कोण कशाला त्यांच्याशी भांडतो.म.प.लिका कर्मचाऱ्यांनी काहीतरी जनची नाहीतर,तत्वांची लाज ठेवा.कधीतरी ह्यांच्यावर धाड टाकण्याचे नाटक करायचे.पुन्हा थोड्या वेळाने.फेरीवाला आपल्या जागेवर उभा.स्थानिक आमदार,खासदार,सामाजिक कार्य करते संस्था कुठे आहेत?त्यांना हे दिसत नाही की,वेड पांघरून पेड गावला जायचे नाटक करायचं.की त्यांचाही स्वार्थ कुठे ह्यात दडलेला आहे? असा संशय येथील जनतेला येत आहे.