बौद्धिक विकलांग, ऑटिझम, सेरेब्रल पाल्सी आणि डाऊन सिंड्रोमशी लढा!

Share

विशेष मुलांच्या पालकांसाठी पुण्यात राज्यस्तरीय सभेचे आयोजन

मुंबई : ता. २१ (प्रतिनिधी):
बौद्धिक विकलांग, ऑटिझम, सेरेब्रल पाल्सी आणि डाऊन सिंड्रोम असलेल्या मुलांच्या पालकांसाठी प्रेरणादायी आणि माहितीपूर्ण राज्यस्तरीय सभेचे आयोजन करण्यात आले आहे. ही सभा रविवार, २ नोव्हेंबर २०२५ रोजी सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत जे. पी. नाईक सभागृह, पौड रोड, कोथरूड, पुणे येथे होणार आहे.

‘असोसिएशन ऑफ पेरेंट्स ऑफ मेंटली रिटार्डेड चिल्ड्रेन (आधार)’ या संस्थेतर्फे या सभेचे आयोजन करण्यात आले आहे. गेल्या ३१ वर्षांपासून आधार संस्था प्रौढ बौद्धिक विकलांग व्यक्तींसाठी तहहयात संगोपन व निवासी सुविधा पुरवित असून, महाराष्ट्रातीलच नव्हे तर देशातील एक प्रमुख पालकसंघटना म्हणून ओळखली जाते.

१९९० साली स्थापन झालेल्या या संस्थेत १० विश्वस्तांपैकी ७ विश्वस्त हे स्वतः विशेष मुलांचे पालक आहेत. सध्या तीन जिल्ह्यांतील शाखांमधून ३४४ बौद्धिक विकलांग व्यक्तींचा सांभाळ केला जात आहे. आजवर संस्थेने सुमारे १००० हून अधिक पालकांच्या “माझ्यानंतर काय?” या प्रश्नाचे निरसन करून त्यांना दिलासा दिला आहे.

या सभेत प्रमुख वक्ते म्हणून सुप्रसिद्ध लेखक व पालक अच्युत गोडबोले विशेष मुलांचे पालनपोषण, समाजातील स्वीकार आणि मानसिक संघर्ष या विषयांवर आपले अनुभव मांडतील.
आधार संस्थेचे अध्यक्ष विश्वास गोरे हे कायमस्वरूपी निवासी संगोपन व्यवस्थेवर मार्गदर्शन करतील, तर सेवा निवृत्त नौदल अधिकारी सीडीआर श्रीरंग बिजूर पालकांसाठी दीर्घकालीन आर्थिक नियोजनाचे सखोल विवेचन करतील.

ही सभा केवळ माहिती देण्यासाठी नव्हे, तर पालकांना परस्पर अनुभवांची देवाणघेवाण, मानसिक आधार आणि आपल्या मुलांच्या भविष्यासाठी ठोस निर्णय घेण्यासाठी एक व्यासपीठ ठरणार आहे.

या सभेसाठी नावनोंदणी पूर्णतः विनामूल्य असून, जास्तीतजास्त पालकांनी सहभाग घ्यावा, असे आयोजकांनी आवाहन केले आहे.
अधिक माहितीसाठी आणि नोंदणीसाठी संपर्क: ९९८७३२२०५० / ९०८२६४०४१३


Share

6 thoughts on “बौद्धिक विकलांग, ऑटिझम, सेरेब्रल पाल्सी आणि डाऊन सिंड्रोमशी लढा!

  1. खुप छान काम करत आहे असे मार्गदर्शन सतत केले पाहिजे

  2. Trang này có chương trình khuyến mãi cực sốc! Nạp 500k nhận 1 triệu, tôi đã trúng thật! Giao diện đơn giản nhưng hiệu quả. Ai cần tiền nhanh thì thử 555win!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *