भटके श्वानांचा मालवणीत हैदोस……

Share

प्रतिनिधी :वैशाली महाडिक

मुंबई: मालाड मालवणीतील एमएचबी कॉलोनीतील रहिवासी ß शेखवय 50 वर्ष यांचे भटके कुत्र्यांनी तोडले लचके.मंगळवार दिनांक 8 जुलै रोजी रात्री 9 वाजताच्या सुमारास दवाखान्यातून औषध घेऊन परतताना त्यांनी चाळीच्या परिसरात  काही भटके श्वान छोटे मुलांच्या वर भुंकत भुंकत त्यांच्या अंगावर धावून चावण्याचा प्रयत्न करत होते.हे पाहून रफिक मुलांना वाचवण्यासाठी पुढे आले व भटके श्वानांना हकलून लावण्याचा प्रयत्न करू लागले  या मुळे  आगदीच भडकलेले श्वानांनीं रफिक शेख यांच्यावर हल्ला चढवला त्यात रफिक यांच्या उजव्या हाताचा लचका या श्वानांनी घेतला. तसेच त्यांचे कपडे फाडले आणि त्यांच्या पायाला व इतर भागात चावा घेतला त्यामुळे हृदय रोगाने ग्रस्त रफिक शेख हे खूप घाबरले आणि त्यांचा रक्तदाब वाढला तसेच हाताला गंभीर जख्म झाली. सुदैवाने शेजारी यांनी हे पाहून लाकडी घेऊन पुढे आले व त्यांनी या भटके श्वानांना  तेथून पळवून लावले.त्यामुळे त्यांचा जीव वाचला मात्र ते गंभीर जख्मी झाल्याने त्यांना कांदिवलीतील डॉ. बाबा साहेब आंबेडकर रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. 

पालिकेने या भटके श्वानांचा बंदोबस्त करने आवश्यक आहे. तसेच  अशा घटना टाळण्यासाठी  या श्वानांना वस्तीतून बाहेर काढणे जरुरीचे आहे या बाबत ही पालिका पी उत्तर विभागाने कारवाई करावी अशी मागणी आहे.-प्रशांत सुतार सामाजिक कार्यकर्ते


Share

One thought on “भटके श्वानांचा मालवणीत हैदोस……

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *