भाईंदर येथे मराठी धंदा करणाऱ्या भूमिपुत्रांवर जीवघेणा हल्ला…

Share

.
प्रतिनिधी : सुरेश बोर्ले

भायंदर : नुकताच मीरा रोड येथील घडलेला प्रकार ताजा असताना!काल भाईंदर येथे,पुन्हा परप्रांतीय धंदे वाईकांनी धंदा लावण्याच्या वादावरून, अनेक मराठी माणसांवर जीवघेणा हल्ला केला. हा हल्ला इतका जबरदस्त होता की, अनेकांना गंभीर दुखापत झालेली आहे.ह्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ महाराष्ट्र एकीकरण समितीने हल्लेखोंवरती “मोक्का” लावावा अशी मागणी केलेलीआहे. एकंदरीत पाहता,परप्रांतीय लोकांवर आता पोलिसांचा वचक राहिलेला नाही,हे स्पष्ट होत आहे.ह्या अवैध्य धंद्यांना पोलिस व प्रशासन हे आपला मोठा स्वार्थ जपून त्यांना खतपाणी घालून, त्यांना अवैध धंद्यांसाठी
प्रोत्साहित करीत आहेत.हे आता उघड सत्य जनतेला समजलेलं आहे. स्थानिक जर धंदा करायला गेल्यास,हीच स्वार्थसाधू माणसे परप्रांतियांना मराठी माणसा विरुद्ध भडकावतात व अनेक अडचणी निर्माण करतात. ही बाब जनता जाणूनआहे.तर मुर्दा, राई गावातील स्थानिक आगरी कोळी हे मराठी नाहीत का?त्यांनी त्वरित पेटून उठायला हवे होते.फक्त सूर्य बुडाला गाडी उडाला,हीच कामे करायची! जागेवरून एकमेकांचे जीव घ्यायचा हेच करायचे.मराठी आगरी कोळी हिंदू म्हणून तुम्हाला अभिमान आहे का नाही?दहिसर ते विरार हा पट्टा तुमच्या ताब्यात असताना!काय झाले तर मुंबईकर येतात! नेते येतात.ह्याची तुम्हाला लाज वाटली पाहिजे.तर वी वा बारवाले, कॉलेजवाले कुठे गेला आपला वचक?आपण मराठी नाही वाटत?की शिट्या वाजवून वसई ते पालघरचा विकास होणार आहे का?आता तुमच्याही पुढील वाटा कठीण झालेल्या आहेत.आपली पोट भरलेली असतील, तर कृपया स्थानिक भूमिपुत्रांना न्याय देण्याचा प्रयत्न करावा,हे विरारकर जनतेला वाटत आहे. विरारला आता तर परप्रांतीयांचा जबरदस्त वेढा पडलेला आहे.हा लोंढा एकदिवस तुमच्या पर्यंत येणार हे निश्चीत आहे.त्यावेळेला आपल्याला भूमिपुत्रच वाचावणार हे लक्ष्यात घ्या!


Share

2 thoughts on “भाईंदर येथे मराठी धंदा करणाऱ्या भूमिपुत्रांवर जीवघेणा हल्ला…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *