
प्रतिनिधी :वैशाली महाडिक
मुंबई: स्वातंत्र्य दिनानिमित्त भाकर फाउंडेशन गोरेगाव च्या वतीने शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना क्राफ्ट आणि ड्रॉइंग किटचे वाटप करण्यात आले. या उपक्रमाचा उद्देश विद्यार्थ्यांच्या सृजनशीलतेला प्रोत्साहन देणे आणि राष्ट्रीय सणाचे महत्त्व बालमनात रुजविणे हा होता.कार्यक्रमात भाकर फाउंडेशनच्या बालसभेतील सदस्यांनी स्वातंत्र्यदिनानिमित्त प्रेरणादायी भाषणे दिली तसेच विविध गाणी गायली. यामुळे संपूर्ण वातावरण आनंददायी आणि उत्साहवर्धक झाले.
या वेळी भाकर फाउंडेशनचे अध्यक्ष ॲड. दिपक सोनावणे, मयूर जाधव, प्रशांत चव्हाण, मानसी आचरेकर तसेच बालसभेचे प्रमुख श्लोक गुप्ता व कस्तुरी शाहू यांच्यासह बालसभेतील इतर सदस्य उपस्थित होते.
भाकर फाउंडेशनतर्फे अशा उपक्रमांद्वारे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना देत समाजात सकारात्मक बदल घडविण्याचा प्रयत्न सतत केला जात असल्याचे अध्यक्ष ॲड. दिपक सोनावणे यांनी यावेळी सांगितले.
Khup chan
Gd
Niceee