भाकर फाऊंडेशन सेंटरवर  “पुस्तकांची गुढी” उभारली.

Share

एसएमएस -प्रतिनिधी -उत्कर्ष बोर्ले

मुंबई :भाकर फाऊंडेशन सेंटर, भगतसिंग नगर नं. 2, गोरेगाव (पश्चिम), मुंबई येथे भाकर फाऊंडेशनच्या वतीने वाचन संस्कृती जोपासण्यासाठी सालाबादप्रमाणे यंदाही गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर “पुस्तकांची गुढी” मोठ्या उत्साहात उभारण्यात आली. या ठिकाणी आयोजित कार्यक्रमातून समाजात ज्ञान, विचार आणि वाचनाची आवड वाढविण्याचा संदेश देण्यात आला.

गुढीपाडवा हा नवचैतन्य, विजय आणि नव्या सुरुवातींचा सण मानला जातो. पारंपरिक गुढी ही समृद्धी, संस्कृती आणि यशाचे प्रतीक आहे. याच विचारांना पुढे नेत भाकर फाऊंडेशनने “पुस्तकांची गुढी” उभारून आधुनिक काळात ज्ञानाचं प्रतीक म्हणून पुस्तकांचा सन्मान केला. ज्या प्रकारे पूर्वी गुढी उभारून विजयाचा गौरव केला जात होता, त्याचप्रमाणे आजच्या युगात पुस्तकं हीच खरी ज्ञानाची गुढी ठरून समाजाला दिशा देणारी शक्ती आहे, असा संदेश या उपक्रमातून देण्यात आला.

भाकर फाऊंडेशनचा हा उपक्रम केवळ एक परंपरा नसून ज्ञान, संस्कृती आणि सामाजिक बांधिलकी यांचा सुंदर संगम आहे. अशा उपक्रमांमुळे नव्या पिढीत वाचनाची गोडी निर्माण होऊन सुजाण व सुसंस्कृत समाज घडण्यास मदत होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.

या प्रसंगी भाकर फाऊंडेशनचे अध्यक्ष ॲड. दिपक सोनावणे, शकुंतला वाघचौरे, अजय भालेराव, मानसी आचरेकर, कस्तुरी शाहू तसेच बालसभेचे सदस्य उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी वाचनाचे महत्त्व अधोरेखित करत समाजातील प्रत्येक घटकाने पुस्तके वाचण्याची सवय अंगीकारावी, असे आवाहन –

ॲड.दिपक सोनावणे -´भाकर फाऊंडेशन

निसार अली 


Share

One thought on “भाकर फाऊंडेशन सेंटरवर  “पुस्तकांची गुढी” उभारली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *