
प्रतिनिधी:सुरेश बोरले
मुंबई,नरेंद्र मोदींच्या कर्तृत्वाच्या जोरावर, बी जे पी.सरकार केंद्रात आरुढ झाले.आकाशातील ग्रह मालिकेत, सूर्यनारायण मध्य स्थानी आहेत.त्या प्रमाणे,मोदी हे बी जे पी मध्ये मध्य स्थानी आहेत.ते त्यांचं स्थान अढळ आहे.पण बी जे पी मध्ये ज्या ग्रहांना,ग्रहण लागलेले आहे.ते ग्रह आज देशामध्ये प्रत्येक बाबतीत, अराजकता माजवत आहेत.त्यावर तोडगा काढण्यात हे ग्रह उपयशी ठरताहेत.ही आपल्या देशासाठी, धोकादायक बाब आहे.कारण आज महीलांवर्ती अत्याचार होत आहेत, आहेत.त्यांचा खून होतोय.प्रत्येक प्रांतात,राजकीय व धार्मिक रस्सीखेच आहे.ईडीची चौकशी,आरोप प्रत्यारोप,आयकराच्या धाडी विरोधकांवर लावायच्या.काय हे चालले आहे?महिला पेहेलवणांवर शारीरिक शोषण केल्याच आरोप उत्तर प्रदेशातील,एका खासदारावर होतोय,जे की अखिल भारतीय कुस्तीचे अधक्ष्य आहेत.त्यांना क्लीन चीट देऊन, पहिलवानांना फरफटत अटक करीत आहेत.हा न्याय आहे का?तर संभाजी नगरात, जातीय दंग झाली.काय केलं सरकारने?समज कंटकांना सजा व्हायला पाहिजे.ती होते का?विरोधक म्हणजे पापी व हेच तेवडे पाक.बी.जे.पी.वालयांस, काहीच भीती नाही.नुकताच ओडिसा मध्ये महाभयंकर रेल्वे अपघात झाला.अशावेळी रेल्वे मंत्र्यांनी त्वरित रजिमना द्यायला हवा होता,दिला का,? अस यापूर्वी केंद्रात घडलेलं आहे.म्हणजे फक्त सत्ता भोगायची! बास्स, महागाईने कहरच केलेला आहे! कधी अच्छे दिन येणार, यातच माणसाचे आयुष्य जाणार?अस असल्यास,बी.जे.पि ला पुढची वाटचाल कठीण आहे.महाराष्ट्राचा जो बट्ट्याबोळ झालेला आहे तो लोकांनी पाहिलेला आहे.येणाऱ्या निवडणुकीत त्याचे पडसाद उमटणारच.अखिल भारतीय शेतकऱ्यांना आंदोलन करून ही न्याय नाही .अजून त्यांना न्याय नाही.ह्या वेळेस,सत्ता पालट होऊ शकते.