प्रतिनिधी :मिलन शहा
मध्यप्रदेश: जबलपूर पोलिसांनी भाजप नेते आणि माजी मंडळ अध्यक्ष अतुल चौरसिया यांना सेक्स रॅकेट प्रकरणात अटक केली आहे. एका तरुणीने आरोप केला आहे की ती जबलपूरमध्ये नोकरीच्या शोधात आली होती. अतुल आणि त्याची साथीदार शीतल दुबे यांनी तिला एका हॉटेलमध्ये राहायला लावले. नंतर त्यांनी तिला मोठ्या पैशांचे आमिष दाखवून सेक्स रॅकेटमध्ये ढकलले.
हे दोघे हॉटेलमध्ये येणाऱ्या ग्राहकांकडून 2 ते 5 हजार रुपये घेत असत. त्या बदल्यात ते तरुणीला खूप कमी पैसे देत असत. आता ही तरुणी हॉटेलमधून स्वतःची सुटका करत पोलिसांकडे तक्रार केली. पोलिसांनी तात्काळ हॉटेलवर छापा टाकत मुख्य सूत्रधाराला अटक केली..
पोलिस तपासात असे समोर आले आहे की आसाम, पश्चिम बंगाल, छत्तीसगड, सिक्कीम येथील मुली देखील यात अडकल्या चा संशय व्यक्त केला अनेक तरुणी या हॉटेलमध्ये येत असल्याचे पोलिसांना कळले आहे.
Bjp या वर काय कारवाई करणार?