भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर गीतसंग्रहाचे उद्घाटन..

Share

एसएमएस -प्रतिनिधी – सुरेश बोर्ले


मुंबई : दिनांक ५ एप्रिल २०२६ रोजी सायंकाळी गोराई येथील गंधर्व बँकेट हॉलमध्ये धर्मेश म्युझिकल ग्रूपच्या वतीने मराठी व हिंदी गाण्यांचा रंगारंग कार्यक्रम उत्साहात पार पडला. कार्यक्रमाला संगीतप्रेमींची मोठी उपस्थिती लाभली.
कार्यक्रमाच्या मध्यंतरात, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या येऊ घातलेल्या १४ एप्रिल जयंतीनिमित्त विशेष गीतसंग्रहाचे उद्घाटन करण्यात आले. गंधर्व बँकेटचे मालक राजाभाऊ गायकवाड यांच्या हस्ते हा सोहळा पार पडला.
या प्रसंगी धर्मेश ग्रूपचे विनोद मांढरे, गीतसंग्रहाचे दिग्दर्शक नौशादजी, तसेच कवयित्री व गायिका चैताली गव्हाळे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
सदर गीतसंग्रह सुप्रसिद्ध गायिका चैताली गव्हाळे यांनी स्वतः रचून गायला असून, त्याचे चित्रिकरण हिरव्यागार समुद्र किनाऱ्यावर दृकश्राव्य माध्यमातून करण्यात आले आहे. या गीतसंग्रहाबाबत बोलताना त्यांनी सांगितले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी समाजासाठी केलेले महान कार्य आणि भारतीय राज्यघटना निर्मितीत बजावलेली महत्त्वपूर्ण भूमिका यांपासून प्रेरणा घेऊन हा संग्रह साकारण्यात आला आहे.
हा गीतसंग्रह येत्या १४ एप्रिल २०२६ रोजी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त अधिकृतरीत्या प्रदर्शित केला जाणार आहे.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुरेश बोरले यांनी आपल्या मधुर वाणीमध्ये प्रभावीपणे केले.


Share

One thought on “भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर गीतसंग्रहाचे उद्घाटन..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *