भारताच्या शेजारी देशातील आंदोलने काय संदेश देतात?

Share

लेखक :सुरेश बोर्ले

अत्याचार+ अती अत्याचार+आंदोलन— क्रांती! हे समीकरण आहे.कारण आधी नुसते अत्याचार लोक न ऐकल्यासअती अत्याचार! मग अत्याचारित लोकांकडून आंदोलने आणि मगच क्रांती होते.हा जगाचा इतिहास आहे.जेव्हा अती अत्याचार हा शारीरिक, मानसिकतेवर जेव्हा परम सीमा गाठतो,तेव्हा आंदोलकांची ठिणगी पडते व तिचा दाह निर्माण होऊन आग डोंब उसळतो.ह्याच धुमशानातून
“क्रांती”चा जन्म होतो.अशा अनेक घटना जगात घडलेल्या आहेत. कशाला भारताच्या इतिहासच घेऊ!मोघल आले तेव्हा छत्रपती शिवाजी महाराज,राणा प्रताप,पृथ्वीराज चव्हाण सारख्यांनी सडेतोड लढाया करून हिंदुस्तान वाचविण्याचा प्रयत्न केला.मग आलेल्या ब्रिटिशांनी जागृत भारतीय जनतेवर बेमालून अत्याचार केल्याने आंदोलने वाढली.जस जशी आंदोलने वाढली तशी ब्रिटिशांची अत्याचाराची पद्धत वाढली. त्यामुळे अनेक क्रांतिवीर स्वातंत्रवीर निर्माण झाले.
स्वातंत्र्याची चळवळ सुरू झाली.शेवटी आंदोलकांचा उद्रेक झाला! त्याचे रूपांतर क्रांतीत झाले व इंग्रजांना नमावे लागले आणि १५ ऑगस्ट १९४७ ची भारतीय स्वातंत्र्याची पहाट उजाडली.असे अनेक किस्से जगती आहेत.पण आंदोलनाशिवाय क्रांती नाही हे निश्चित.काही दिवसांपूर्वी श्रीलंकेतील जनतेने ही क्रांती अनुभवली.चीनच्या कर्जाखाली दबावलेला हा देश ! येथील सरकारने चीन कडून घेतलेले अमाप कर्ज ह्यामध्ये सामान्य जनता भरडली.श्रीलंकेत महागाईचा आगडोंग उसळला,
लोकांना मूलभूत गरजानची वानवा झाली.छोटी छोटी आंदोलने झाली.ह्याच आंदोलनाननी शेवटी क्रांतीच रूप घेतलं व जनता ही सरकार विरोधात रस्त्यावर आली. राज्यकर्त्यांना पळताभुई केले.सरकारी निवासस्थाने आगीत भस्मसात केली.सरकारी मुलाझम्मीना शेवटी देशातून हद्दपार व्हावे लागले. मिळेल त्या मार्गाने ते देशाबाहेर निसटले.तीच परिस्थिती काही दिवसांनी बांगला देशात झाली.ह्या देशही चीन कडून कर्जबाजारी आहे.तेथेही महागाईचा भस्मासुर उभा ठाकला! तेथेही तीच परिस्थिती आली व आंदोलनासाठी जनता रस्त्यावर आली.लुटा लूट जाळपोळ सरकारी सदने आगीत भस्मसात करताना येथील पंतप्रधान निवासस्थानाची ज्या महिला आहेत, तोडफोड करताना त्यांची अंतर्वस्त्रही लोकांसमोर प्रदर्शित केली.तेथील मंत्री संत्री पळून गेले.त्यांच्या पंतप्रधानांनी शेवटी भारतात आश्रय घेतला. तर
भारत पाक युद्धातून नवीन बांगलादेश उभारणीत महत्वाची भूमिका निभावणाऱ्या,माजी पंतप्रधान स्व.शेख मुजीब रहमान
ह्यांचे पुतळे लोकांनी अक्षरशः हातोडे व घाणांनी तोडले व जमीनदोस्त केले.हिंदूंना ही लक्ष्य बनवले,त्याची मंदिरे व धर्मस्थळे उध्वस्त केली,महिलांवरही अत्याचार केले.हा सगळा आरोप सरकारवर लागला.देशभरच्या
आंदोलकांनी शेवटी क्रांती करून,
नवीन सरकार स्थापले.रशियाचे उदाहरण घेऊ!अमेरिकेच्या शीतयुद्धात अमेरिकेने रशियाचे पानिपत केले.तेथील जनतेची अन्न पाण्याची हेळसांड झाली. जनता सडकेवर आली अनेक आंदोलने झाली.हे राष्ट्र कम्युनिस्ट आहे,त्या कम्युनिसमवर लोक वैतागली होती !तेथील जनतेला लोकशाहीच वावड लागलं. आंदोलकांनी मग रशिया जडणघडणीत ज्यांनी महत्वाची भूमिका निभावणारया क्रांतिकारक स्व. लेनीन ह्यांचे अवाढव्य पुतळे त्यांनी अक्षरशा जमीनदोस्त केले व त्यावर ते नाचले.कम्युनिसम विरोधात इतका रोष ह्या जनतेचा सरकारवर होता.शेवटी रशियाचे अनेक भागात व विभाजन झाले!हे राष्ट्र दुभंगले.आजही युक्रेन रशिया युद्ध सुरू आहे,तोही ह्या क्रांतीचाच भाग आहे.लोकशाही यावी जी जनतेची इच्छा होती, म्हणून ही क्रांती होती.पण ह्या क्रांती पूर्वीच हा देश रसातळाला गेला होता.कारण अमेरिकेच्या शीत युद्धाने रशिया आजही परिणामीत आहे.तर दुसरा कम्युनिस्ट देश चीनच देता येईल कांहीं वर्षांपूर्वी चीनमध्येही ह्या कम्युनिसम विरोधात,मोठ आंदोलन करण्यात आले होते,पण हे आंदोलन करणारे मात्र विद्यार्थी होते.चीनमध्ये लोकशाही आणावी म्हणून हे विद्यार्थी आंदोलनासाठी रस्त्यावर आले.संपूर्ण चीन ह्या आंदोलनाने व्यापून गेला.पण चीन हे राष्ट्र कडक असल्याने,त्यावेळच्या सरकारने ह्या आंदोलकांना
तियानानमेंन शहरातील चौकात कोंडीत पकडले व ह्या कोवळ्या व विध्यार्थी अवस्थेत असणाऱ्या मुलांवर बेछूट गोळीबार करून, हजारोनची कत्तल केली आणि हे आंदोलन लोकशाहीची क्रांती होण्या पूर्वीच दाबून टाकले.हे हत्याकांड जालियनवाला बागे पेक्षा क्रूर होते.त्यावेळेला चीन हा जागतिक क्रमवारीत नव्हता. कदाचित क्रांती घडली असती तर!चीनचा इतिहास वेगळा असता?एक मात्र गोष्ट पक्की आहे,ती म्हणजे तरुणच राष्ट्र घडवतो विकसित करतो. आंदोलने व क्रांती करून,राष्ट्राचा इतिहास बदलतो. आता नेपाळचे उदाहरण घ्या!नेपाळमध्या जो जनतेचा आक्रोश पहायला मिळतोय!हे आंदोलन आहे ते तेथील राजवटीतील राज्यकर्त्यांनी भ्रमणध्वनींच्या माध्यमांवर निर्बंध आणले म्हणून आहे.हे फक्त निमित्त झाले.तेथील जनतेनेही रस्त्यावर येऊन आंदोलने करून लंके प्रमाणे हैदोस घातला.सरकारी लोकासं व मंत्र्यांना मिळाले तेथे नागडे करून चोपून काढले.त्याची सरकारी व राहती घरे जाळून बेचिराख केली.हा देशही चीनच्या कर्जाखाली धुवून निघालेला आहे.आंदोलन हे माध्यमांचे निमित्त आहे. खरी लढाई ही भ्रष्टाचार महागाई बेकारी व वाढती गुन्हेगारी ह्या विरोधात आहे. संपूर्ण राष्ट्र ह्या आंदोलनात सामील झाले.ह्या आंदोलनाने क्रांती केली व सरकारी राजवटीत बदल झाला.पंतप्रधानासहित सगळ्या मंत्र्यांनी राजीनामे दिले व नवीन सरकार स्थापन झाले. कोणतेही राष्ट्र तरुणाइशी खेळते तेव्हा क्रांती ही निश्चित असते.
कारण तरुणाई हाच राष्ट्राचा आधार आहे.तिला छेडले तर नेपाळ सारखी अवस्था होऊ शकते.कारण भ्रमणध्वनी हा महत्वाचा घटक व अविभाज्य भाग हा तरुणाच्या जीवनाचा झालेला आहे.त्यातील महत्वाच्या माध्यमांवर जर तुम्ही गदा आणल्यास,ही तरुणाई गप्प बसणार नाही.आधीच हा नेपाळी तरुण अनेक समस्यांनी गांजलेला आहे,त्यात सरकारने भ्रमणध्वनी सारख्या वस्तूवर बंधने टाकली, त्यामुळे ते उसळून उठले.कारण हातातील महत्वाचे साधन तुम्ही त्यांचे हिरावून नेताय, ज्याच्यामुळे ते प्रत्येक गोष्टीत ते कार्य करू शकतात.साधी माध्यमांची ही क्रांती सत्तापालट करून गेली.संपूर्ण जगाने हे पाहिले आहे.म्हणून तरुणाईला सांभाळणे व तिला जपणे हे प्रत्येक राष्ट्रातील!राज्यकर्त्यांचे
कर्तव्य आहे.ते कर्तव्य त्यांनी नाही निभावल्यास क्रांती नक्की आहे.ही नोंद नक्की घ्यावी.
क्रमश….


Share

3 thoughts on “भारताच्या शेजारी देशातील आंदोलने काय संदेश देतात?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *