
file photo
प्रतिनिधी :मिलन शहा.
मालदीवने भारताचे आभार मानले..!
मालदीव सरकारच्या विनंतीवरून भारताने 50 मिलियन अमेरिकन डॉलर्सच्या ट्रेझरी बिलाची रक्कम आणखी एका वर्षासाठी वाढवून अर्थसंकल्पीय मदत वाढवली आहे.
मालदीवचे परराष्ट्र मंत्री डॉ. अब्दुल्ला खलील यांनी या मदतीबद्दल भारत सरकार आणि परराष्ट्र मंत्री यांचे आभार मानले आहेत.
तसेच जयशंकर यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करत. मालदीव आणि भारत यांच्यातील खोल मैत्रीचा उल्लेख करताना त्यांनी सांगितले की ही मदत आपल्या आर्थिक बळकटीला मदत करेल.