बॉम्सफोटातील १२ आरोपींची निर्दोष मुक्तता!
प्रतिनिधी : सुरेश बोर्ले
मुंबई ११ जुलै,२००६ साली पश्चिम रेल्वे लोकलमध्ये ५ मिनिटात सात ठिकाणी जीवघेणे अनेक साखळी बाँबस्फोट झाले त्यामध्ये २००हून अधिक लोक मृत्युमुखी पडले व १०००हून अधिक लोक जख्मी झालेली होती.सर प्रकरणी ए टी एसने १२ जणांना संशयित म्हणून ताब्यात घेऊन,त्यांच्यावर या प्रकरणी दोषी ठरवून ,त्यांना १९ वर्षे तुरुंगात ठेवले होते. व त्यांच्यावर खटलाही चालू ठेवला होता.त्यामध्ये काहींना फाशी व जन्मठेप अशी शिक्षा खालच्या कोर्टाने सुनावली होती. परंतु १९ वर्षानंतर ह्या सगळ्यांची फाशी व जन्मठेप रद्द करून त्यांची बिनविरोध निर्दोध मुक्तता करण्यात आली.मग बाँबस्फोट कोणी केले?मग ही अटक केलेली आरोपी खरोखरच दोषी नव्हते मग त्यांना १९वर्षे का तुरुंगात सडवले त्यांची भरपाई कोण देणार ? नाहीतर ये टी एस च्या तपास यंत्रणेत कांहीं तफावत होती का?गुन्हा सिद्ध करण्यास काही त्रुटी राहिल्या काय?असे अनेक प्रश्नांची गुंतागुंत ह्या प्रकरणी लोकांनमध्ये आहे.कारण निष्पाप जीव येथे गेलेआहेत.अनेक कायमचे जायबंदी झाले.ज्यांचा घरचा माणूस हयात बळी पडला त्यांना तरी न्याय मिळाला का?हा सवाल आहे?मग अशावेळी ह्या पोलिस यंत्रणा, एटीएस यंत्रणा आणि न्याय व्यवस्थेवर,कुणाचा विश्वास राहील का?उच्च न्यायालयाच्या ह्या निर्णयाने, संपूर्ण देश आश्चर्यचकित झालेला आहे.लोकशाहीवरचा विश्वास रयतेचा उडाला आहे.म्हणजे १९ वर्षे लोकांच्या डोळ्यात धूळफेक झालेली आहे.यात कांहीतरी काळभेर व स्वार्थ जपला गेलेला आहे.कदाचित निरपराधी लोक अडकली गेली व अपराधी मोकाट फिरत आहेत,असा लोकांचा कयास आहे.पाहू आता मुख्य मंत्री या निकाला संबंधी!सर्वोच्च न्यायालयात पुढे दावा दाखल करणार आहेत.ते वकिलांशी चर्चा करणार आहेत!पाहू आता तरी पिढीत्यांना व रयतेला न्याय मिळतो का?की खरे आरोपी गजाआड होतील का? काळाच्या गर्भात काय लपलेले आहे!ते काळच ठरवेल.
???समान्यन्ना पडलेला प्रश्न