एसएमएस -प्रतिनिधी-सुरेश बोर्ले
क्रिकेट: महिला विश्वचषक २०२५ स्पर्धेत भारतीय महिला संघाने आपले स्वप्न साकार केले आहे.
नवी मुंबईतील डी. वाय. पाटील स्टेडियमवर झालेल्या रोमांचक अंतिम सामन्यात भारताने दक्षिण आफ्रिकेचा ५२ धावांनी पराभव करत विश्वविजेतेपद पटकावले.
भारताने प्रथम फलंदाजी करत ३ गड्यांच्या मोबदल्यात २९८ धावा उभारल्या. प्रत्युत्तरात, भारतीय गोलंदाजांनी अचूक आणि संयमी मारा करत दक्षिण आफ्रिकेचा संघ २४६ धावांवर गारद केला.
या सामन्याला मुंबईचा राजा रोहित शर्मा, मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर, जय शहा आणि अनेक नामवंत व्यक्ती उपस्थित होते.
भारतीय महिला संघाने जेव्हा विश्वचषक उंचावला, तेव्हा संपूर्ण भारतात जल्लोषाचा माहोल निर्माण झाला — लोकांनी फटाके फोडले, ढोल-ताशांचा नाद झाला आणि अभिमानाने देशभर ‘भारत माता की जय’चा जयघोष झाला.
संघाचे प्रशिक्षक अमोल मुजुमदार आणि सर्व खेळाडू आनंदाने एकमेकांना मिठ्या मारताना दिसले.
भारतीय महिला क्रिकेटच्या इतिहासात ही विजयकथा सुवर्णाक्षरांनी कोरली जाईल!
Congratulations
अभिनंदन भारतीय महिला क्रिकेटसंघाचे
Great going girls
Great
क्रिकेट विश्वात महिला वर्गाचा हा धडा इतिहास जमा झाला.