
प्रतिनिधी :वैशाली महाडिक
राष्ट्रीय लोकसंख्या शिक्षण प्रकल्प 2022/23 अन्वये होणाऱ्या भूमिका अभियान व लोकनृत्य स्पर्धा ह्या फक्त हिंदी आणि इंग्रजी माध्यमातून होणार आहे हि अतिशय गंभीर बाब आहे. हा मराठी भाषेचा मोठा अपमान आपल्या विभागाने केला आहे.असे पत्रात नमूद करून मनसे पदाधिकारी रोहित दंडवते यांनी इमेल द्वारा शिक्षण विभागाला प्रश्न विचारत मागणी केली आहे
भाषा सूत्रानुसार हिंदी आणि इंग्रजी बरोबरच मराठीचा वापर करणेबाबत बंधनकारक असतानासुद्धा शिक्षण विभागाने सदर पत्रात मराठी भाषेला डावलण्यात आले आहे.हे मराठी भाषीक विद्यार्थ्यांवर अन्यायकारक आहे.
तरी भूमिका अभियान व लोकनृत्य स्पर्धासाठी जरी केलेल्या पत्रामध्ये दुरुस्ती करून मराठी माध्यमातून स्पर्धा घेण्यासाठी योग्य ती कार्यवाही करावी हि नम्र विनंती चे पत्र शिक्षण विभागात ला ईमेल द्वारा पाठवले आहे.
–