मंत्रालयात३५ हजारांची लाच स्वीकारताना क्लर्क जेरबंद..

Share

एसएमएस -प्रतिनिधी -मिलन शहा

मुंबई : मंत्रालयात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) मोठी कारवाई करत अन्न व औषध प्रशासन (FDA) विभागातील एका क्लर्कला ३५ हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ अटक केली. राजेंद्र ढेरंगे असे अटक करण्यात आलेल्या कर्मचाऱ्याचे नाव आहे.
तक्रारदाराचा मेडिकल परवाना निलंबित करण्यात आला होता. तो पूर्ववत करून देण्यासाठी ढेरंगे यांनी ५० हजार रुपयांची लाच मागितल्याची तक्रार एसीबीकडे करण्यात आली होती. तडजोडीनंतर ३५ हजार रुपयांवर व्यवहार ठरल्यानंतर एसीबीने सापळा रचला.
मंत्रालयाच्या दुसऱ्या मजल्यावर लाच स्वीकारताना ढेरंगे यांना एसीबीच्या पथकाने पकडले. या कारवाईमुळे मंत्रालयात एकच खळबळ उडाली असून संबंधित विभागात चर्चांना उधाण आले आहे.
या प्रकरणी अधिक तपास सुरू असून आरोपीविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे.


Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *