
प्रतिनिधी:उत्कर्ष बोरले
अवघ्या 12 दिवसात पडले 3 मोठे झाडं
मुंबई,मढ मार्वे रोड येथील पटेल वाडी येथे रस्त्यावर मोठं झाड पडून वाहतूक काही काळ बंद झाली होती.मालाड पश्चिमेतील मढ मार्वे रोड वर सकाळी साधारणपणे 11 ते 12 वाजताच्या सुमारास मोठं झाड कोसळल्याने मढ ते मालाड व मालाड हुन मढ च्या दिशे ने ये जा करणारी वाहतूक पूर्ण पणे बंद झाली होती.सुदैवाने आर्थिक नुकसान व जीवित हानी टळली मात्र झाड रस्त्याच्या मधोमध पडल्याने वाहतूक खोळंबली होती अग्निशमन दल व पालिका पथक घटनास्थळी पोहचून झाडकापून हटवण्यात जवळपास तास भर वेळ लागल्याने वाहनांच्या मोठं मोठ्या रांगा दोन्ही बाजूने लागल्या होत्या.मागील काही दिवसात मढ मार्वे रोड येथे झाड पडून दुर्घटनेची ही तिसरी वेळ आहे पहिली घटना आकसा बीच जवळ दिनांक 30 जून ला घडली होती तसेच दुसरी घटनादिनांक 6 जुलै रोजी मढ नवल बाग येथे घडली होती आणि आजदिनांक 12 जुलै रोजी ही तिसरी घटना घडली आहे. तिन्ही वेळी मढ मार्वे रोड वर वाहतूक काही काळ दोन्ही दिशेची बंद झाली होती.मढ ते मार्वे आणि मालाड ये जा साठी हा एक मेव रस्ता असल्याने अशा घटना सातत्याने घडत असल्याने याचा वाहतुकीवर ही परिणाम होत आहे.तसेच मढ हे जागतिक प्रसिद्धी चे पर्यटन स्थळ असल्याने येथे देशातून व विदेशातून पर्यटकांची ये जा सुरू असते त्यामुळे जर अशा प्रकारे झाडे पडून दुर्घटना घडत असतील तर त्याचा परिणाम पर्यटकांवर होण्याची भीती आहे तसेच या रस्त्यावर आय.एन.एस.हमला या ठिकाणी रस्त्यावर खड्डे पडले असल्याने त्याचा ही परिणाम वाहतुकीवर होत आहे.
चौकट:मढ हा पर्यटन स्थळ आहे तसेच मढ मार्वे रोड हा व्हीआयपी रस्ता आहे . नवदलाचे आयएनएस हमला ट्रेनिंग केंद्र आणि मढ येथे वायू सेनेचे केंद्र आहे.तसेच दोन पंचतारांकित हॉटेल आहेत आणि चित्रपटांच्या व मालिकांची शूटिंग ही या ठिकाणी सतत सुरू असते.