
प्रतिनिधी : मिलन शहा
मुंबई : यावेळी मतांची चोरी करून लोकशाहीचा गळा आवळणाऱ्या भाजपा आणि निवडणूक आयोगाच्या विरोधात काँग्रेस ने रोष व्यक्त करण्यासाठी उभारण्यात आलेली हंडी फोडून आक्रोशव्यक्त केला.एक व्यक्ती-एक मत हा आपल्या संविधानाचा पाया आहे. निवडणूक आयोगाची जबाबदारी आहे की, एक व्यक्ती-एक मत अबाधित रहावं, पण उलट तेच सत्ताधाऱ्यांशी हात मिळवणूक करून नागरिकांच्या या अधिकारावर गदा आणत आहे.आम्ही संविधानाचे रक्षक आहोत. या विरोधात जननायक राहुलजी गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसनं जनसत्याग्रह सुरू केला आहे.मतांची चोरी हे माझ्या-तुमच्या अधिकारांची चोरी आहे. माझं सर्वांना आवाहन आहे की, मतचोरीविरोधात आमच्या या जनआंदोलनात सहभागी व्हा.चला, एकत्र येऊन मतचोरीविरोधात आवाज उठवूया आणि आपला अधिकार वाचवूया-खासदार वर्षा एकनाथ गायकवाड, अध्यक्षा, मुंबई काँग्रेस.
An enquiry must be carried out
Goodwayto protest democratically