
एसएमएस -प्रतिनिधी -मिलन शहा
मुंबई महानगरपालिका निवडणुकांची घोषणा जवळ येत असताना मतदारयादीत झालेल्या गोंधळामुळे अनेक नागरिकांत नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर युवासेनाप्रमुख व शिवसेना नेते आमदार आदित्य ठाकरे यांनी आज राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांची भेट घेत निवेदन सादर केले.
मतदारयादीतील त्रुटी तातडीने दूर करून संपूर्ण प्रक्रिया निष्पक्ष, पारदर्शक व जनहितकारी व्हावी, अशी मागणी आदित्य ठाकरे यांनी या भेटीत केली.
या चर्चेदरम्यान शिवसेना नेते ॲड. अनिल परब, शिवसेना नेते अंबादास दानवे, मनसे नेते बाळा नांदगांवकर, शिवसेना सचिव सूरज चव्हाण तसेच शिवसेना आणि मनसेचे इतर पदाधिकारी उपस्थित होते.
बैठकीनंतर आदित्य ठाकरे यांनी सांगितले की, “मुंबईसारख्या महानगरात मतदारयादीतील चुका मोठ्या प्रमाणावर लोकशाही प्रक्रियेला बाधा आणू शकतात. निवडणूक आयोगाने तातडीने सुधारात्मक पावले उचलावी, हीच आमची मागणी आहे.”
राज्य निवडणूक आयोगाकडून याप्रकरणी कोणती कार्यवाही होते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Eci करणार नाहीत है ही तिथकच खर आहे.
Eci will it happen??
कैक वर्ष झोपी गेलेला जागा झाला. असं म्हटलं तरी काही वावगं ठरणार नाही.