
प्रतिनिधी :सुरेश बोर्ल
मुंबईत नेस्को केंद्रात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष मा. राजसाहेब ठाकरे यांच्या उपस्थितीत मतदार यादी फेरफार घोटाळ्याबाबतचा प्रेसेंटेशन या मेळाव्यात सादर करण्यात आले.
या विषयावर मतदान मुख्याधिकारी चोखलिंगम यांच्याशी दोनदा चर्चा करण्यात आली. या चर्चेनंतर त्यांनी तत्संबंधी निर्णय घेण्यासाठी दिल्लीतील निवडणूक आयोगाला पत्र पाठवावे लागले, अशी माहिती मनसे प्रमुख यांनी दिली.
मेळाव्यात भाजपाने कशा प्रकारे निवडणुकीतील मतदार यादी घोटाळे केले त्या बाबत सविस्तर प्रेझेंटेशन दृकश्राव्य माध्यमातून सादर केले. त्यात आसाम येथील पंतप्रधानांचे भाषण, तसेच सत्ताधारी पक्ष आणि युतीतील मित्रपक्षांच्या नेत्यांची भाषणे आणि जनतेची मते दाखवण्यात आली.
भाजपावर टीका करताना वक्त्यांनी सांगितले की, “सुमारे ८६ लाख बनावट मतदान झाले आहे. या प्रकरणाचा सखोल अभ्यास करून नवीन मतदार याद्या तयार केल्या पाहिजेत.” तसेच, येणारी निवडणूक बॅलेट पेपरवर घेण्यात यावी, अशी मागणी निवडणूक आयोगाकडे करण्यात आल्याचे ही राज ठाकरे यांनी सांगितले.
मेळाव्याचा समारोप राष्ट्रगीताने झाला. संपूर्ण कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.
Very nice
Badiya