
प्रतिनिधी :मिलन शाह
पक्ष प्रवेशा चा पॅटर्न सर्वत्र राबवणार
दिवा,ठाणे मानपाच्या हद्दीतील दिव्यातील शेकडो नागरिकांचा मनसे आमदार श्री राजू पाटील तसेच अभिजित पानसे आणि विद्यार्थी सेनेचे सरचिटणीस संदीप पाचंगे यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत जाहीर पक्ष प्रवेश केला.
मनसे दिवा शहर तर्फे दिव्यातील सामान्य नागरिकांना दिवा शहरात काही सकारात्मक बदल घडावेत, आपला परिसर आणि आजूबाजूच्या परिस्थितीत सुधारणा व्हावी अशी इच्छा असेल त्यांनी स्वतः पुढाकार घेऊन जबाबदारी घ्यावी असे आवाहन करण्यात आले यासाठी एक गूगल लिंक बनवून ती विविध सोशल माध्यमातून लोकांपर्यंत पोहचवण्यात आली असे मनसे शहर अध्यक्ष तुषार पाटील व प्रशांत गावडे यांनी यावेळी सांगितले. या लिंक च्या माध्यमातून साधारण 400 ते 450 नागरिकांनी फॉर्म भरून मनसेत प्रवेश करून काम करण्याची इच्छा प्रदर्शित केली यात अनेक विद्यार्थी व महिलांची संख्या ही लक्षणीय होती.
पक्ष प्रवेशाच्या या अभिनव संकल्पनेचे मनसे नेते राजू पाटील आणि अभिजित पानसे यांनी तोंड भरून कौतुक केले. पक्ष प्रवेशाचा हाच पॅटर्न महाराष्ट्रातील इतर शहरात आणि जिल्ह्यात राबविण्याबाबात नक्कीच प्रयत्न करू असे मत व्यक्त केले.