प्रतिनिधी :वैशाली महाडिक

मुंबई, मालाड ज्ञानसाधना एज्युकेशन सोसायटी हायस्कूल मनोरी आणि रूम टू रीड इंडिया ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने ऑनलाइन व्यवहार करताना होणाऱ्या फसवणुकीबाबत सायबर सिक्युरिटी या विषयांतर्गत जनजागृती साठी ज्ञानसाधना एज्युकेशन सोसायटी हायस्कूल मनोरी आणि रूम टू रिड इंडिया ट्रस्ट तर्फे , संत बोनावेंचर विभाग ,पाच घर पीटर विभाग ,नित्य सहाय्यक माता चर्च ,मनोरी मार्केट येथे शाळेतील 30 विद्यार्थी व दोन शिक्षक तसेच दोन सोशल मोबिलायझर यांनी प्रभात फेरी काढली.
ऑनलाइन व्यवहार करताना होणाऱ्या फसवणुकीपासून सामान्य नागरिकांचे संरक्षण व्हावे यासाठी या प्रभात फेरीचे आयोजन करण्यात आले होते.
सदर प्रभात फेरी अतिशय नियोजनबद्धरित्या व यशस्वीपणे पार पडली.
