मनोरी- गोराई प्रस्तावित डीसॅलिनेशन प्रकल्पाला विरोध.

Share

एसएमएस -प्रतिनिधी -उत्कर्ष बोर्ले

मुंबई :मनोरी–गोराई समुद्रकिनाऱ्यावर प्रस्तावित खाऱ्या पाण्याचे गोड्या पाण्यात रूपांतर करणाऱ्या (डीसॅलिनेशन) प्रकल्पाच्या सर्वेक्षणाला स्थानिक मच्छिमारांनी तीव्र विरोध दर्शविला आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी गुरुवारी (दि. २६) गोराई मच्छिमार सहकारी संस्थेत या प्रकल्पाचे सादरीकरण केले असता, संतप्त मच्छिमारांनी ते मध्येच थांबवत अधिकाऱ्यांना जाब विचारला.
सभेदरम्यान नॅशनल फिशवर्कर्स फोरम (NFF)चे अध्यक्ष रामकृष्ण तांडेल यांनी चेन्नईतील अशा प्रकल्पांविरोधातील सुरू असलेल्या आंदोलनांचा संदर्भ देत, “मासेमारीवर कोणताही परिणाम होत नाही हा दावा चुकीचा आहे,” असे ठामपणे सांगितले. लहान जातींचे मासे फिल्ट्रेशन प्रक्रियेत नष्ट होतील तसेच समुद्रात सोडल्या जाणाऱ्या खाऱ्या पाण्यामुळे क्षाराचे प्रमाण वाढेल, असेही त्यांनी नमूद केले.
दररोज ५०० दशलक्ष लिटर पाणी प्रक्रियेत घेऊन त्यातून फक्त २०० दशलक्ष लिटर पाणी शुद्ध केले जाणार असून उर्वरित ३०० दशलक्ष लिटर पाणी पुन्हा समुद्रात सोडले जाणार आहे. या प्रक्रियेचा समुद्री जैवसाखळीवर गंभीर परिणाम होईल, असा इशारा मच्छिमारांनी दिला.
महाराष्ट्र मच्छिमार कृती समितीचे सरचिटणीस किरण कोळी यांनी पालिकेच्या सादरीकरणावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत, “१७७ देशांची उदाहरणे देताना त्या देशांतील पर्जन्यमान, नद्या यांचा उल्लेख का केला नाही? आपल्या देशात पावसाचे पाणी अडवून व्यवस्थापन करण्याऐवजी समुद्रकिनाऱ्यावर असे प्रकल्प आणणे योग्य आहे का?” असा सवाल उपस्थित केला.
तसेच प्रकल्पातून निर्माण होणारे रासायनिक अवशेष तलोजा येथे नेले जाणार असल्याच्या दाव्यावरही त्यांनी टीका केली. “समुद्र आधीच प्रदूषित आहे, तो रसायनमुक्त करण्याऐवजी नव्या प्रदूषणाची भर घालण्याचा हा प्रकार आहे,” असे त्यांनी स्पष्ट केले.
मच्छिमारांनी पावसाळ्यानंतरच्या मासेमारी हंगामाचा उल्लेख करत सांगितले की, गोड्या पाण्याच्या प्रवाहामुळे किनारी भागात मोठ्या प्रमाणात मासे उपलब्ध होतात, ज्यावर त्यांचा उदरनिर्वाह अवलंबून आहे. या प्रकल्पामुळे हा नैसर्गिक चक्र बाधित होण्याची भीती त्यांनी व्यक्त केली.
“मुंबईतील वाढती लोकसंख्या आणि श्रीमंतांसाठी उभारले जाणारे प्रकल्प यासाठी आमच्या समाजाला वेठीस धरले जात आहे का?” असा सवाल उपस्थित करत, स्थानिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.
एमएमकेएसचे अध्यक्ष लिओ कोलासो यांनी, “हा प्रकल्प कोणत्याही परिस्थितीत होऊ देणार नाही. जबरदस्ती केल्यास तीव्र आंदोलन उभारले जाईल,” असा इशारा दिला.
या बैठकीत मढ, मनोरी, उत्तन, भाटी, मालवणी आदी परिसरातील विविध मच्छिमार सहकारी संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी सहभाग घेत प्रकल्पाच्या विरोधात सविस्तर मते मांडली.
दरम्यान, पालिकेच्या अधिकाऱ्यांनी मच्छिमारांच्या भावना वरिष्ठांपर्यंत पोहोचवण्याचे आश्वासन दिले असून, लेखी निवेदन देण्याची विनंतीही केली आहे.

मालाड, दि. २७ (प्रतिनिधी): मनोरी–गोराई समुद्रकिनाऱ्यावर प्रस्तावित खाऱ्या पाण्याचे गोड्या पाण्यात रूपांतर करणाऱ्या (डीसॅलिनेशन) प्रकल्पाच्या सर्वेक्षणाला स्थानिक मच्छिमारांनी तीव्र विरोध दर्शविला आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी गुरुवारी (दि. २६) गोराई मच्छिमार सहकारी संस्थेत या प्रकल्पाचे सादरीकरण केले असता, संतप्त मच्छिमारांनी ते मध्येच थांबवत अधिकाऱ्यांना जाब विचारला.
सभेदरम्यान नॅशनल फिशवर्कर्स फोरम (NFF)चे अध्यक्ष रामकृष्ण तांडेल यांनी चेन्नईतील अशा प्रकल्पांविरोधातील सुरू असलेल्या आंदोलनांचा संदर्भ देत, “मासेमारीवर कोणताही परिणाम होत नाही हा दावा चुकीचा आहे,” असे ठामपणे सांगितले. लहान जातींचे मासे फिल्ट्रेशन प्रक्रियेत नष्ट होतील तसेच समुद्रात सोडल्या जाणाऱ्या खाऱ्या पाण्यामुळे क्षाराचे प्रमाण वाढेल, असेही त्यांनी नमूद केले.
दररोज ५०० दशलक्ष लिटर पाणी प्रक्रियेत घेऊन त्यातून फक्त २०० दशलक्ष लिटर पाणी शुद्ध केले जाणार असून उर्वरित ३०० दशलक्ष लिटर पाणी पुन्हा समुद्रात सोडले जाणार आहे. या प्रक्रियेचा समुद्री जैवसाखळीवर गंभीर परिणाम होईल, असा इशारा मच्छिमारांनी दिला.
महाराष्ट्र मच्छिमार कृती समितीचे सरचिटणीस किरण कोळी यांनी पालिकेच्या सादरीकरणावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत, “१७७ देशांची उदाहरणे देताना त्या देशांतील पर्जन्यमान, नद्या यांचा उल्लेख का केला नाही? आपल्या देशात पावसाचे पाणी अडवून व्यवस्थापन करण्याऐवजी समुद्रकिनाऱ्यावर असे प्रकल्प आणणे योग्य आहे का?” असा सवाल उपस्थित केला.
तसेच प्रकल्पातून निर्माण होणारे रासायनिक अवशेष तलोजा येथे नेले जाणार असल्याच्या दाव्यावरही

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *