प्रतिनिधी : उत्कर्ष बोर्ले
स्वामी चिंचोलीचे (ता. दौंड) ग्रामपंचायत सदस्य, सोसायटी संचालक राजीनामा देणार
पुणे- मराठा समाजाच्या ओबीसी आरक्षणाच्या मागणीसाठी सुरू असलेल्या आंदोलनाला आता राजीनाम्यांची साथ मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर स्वामी चिंचोली ( ता. दौंड ) विकास सेवा सोसायटीचे संचालक रामचंद्र मधुकर शेंद्रे यांच्यासह संभाजी काळे, ग्रामपंचायत सदस्य प्रा.धनाजी मत्रे यांनी आपल्या पदाचा राजीनामा देण्याची घोषणा केली आहे. सोमवारी (दि.१) शासकीय कामकाजाच्या वेळेत संबंधित प्रशासकीय अधिकारी यांच्याकडे राजीनामा देणार आहेत.
मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईत आझाद मैदानावर उपोषण सुरू केले आहे. त्याच पार्श्वभूमीवर आता गावोगावी विविध मार्गाने नागरिकांकडून उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला जात आहे. मागण्या मान्य न झाल्यास काही ठिकाणी आंदोलने सुरू होण्याच्या मार्गावर आहेत. तसेच आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आता सोसायटी पदाधिकारी आणि ग्रामपंचायत सदस्यांनी राजीनाम्यांचा मार्ग स्वीकारला आहे. यामुळे आरक्षण चळवळीला आणखी गती मिळण्याची शक्यता आहे.
मी चिंचोली विकास सेवा सोसायटीचा संचालक असून, मराठा ओबीसी आरक्षणाच्या मागणीसाठी सोमवारी दि.१ सप्टेंबरला सकाळी सचिवाकडे माझा संचालक पदाचा राजीनामा देणार आहे. चिंचोलीतील सर्व सोसायटी सभासदांनी मला निवडून दिले याबद्दल मी त्यांचा आभारी आहे.
रामचंद्र शेंद्रे, विकास सेवा सोसायटी सदस्य, स्वामी चिंचोली
मंत्री संत्री कधी पुढाकार घेणार?