मराठा मोर्चाला अटी तटी ?मात्र कबुतरबाजांना???

Share

.
प्रतिनिधी: सुरेश बोर्ले

मुंबई : देवेंद्र साहेब कुठे आणून ठेवला आहे आमचा महाराष्ट्र?आमच्या ह्या राज्यात आम्हालाच स्वतःची आंदोलने लोकशाही मार्गाने करायला, सक्तीच्या अटींची परवानगी लागते? हे आमचं दुर्दैव आहे.नुकतच जैन समाजाने!कबूत्रांसाठी घातलेला गोंधळाच आंदोलन,दादर येथे केल! जेकी मानवी जीवनासाठी हानीकारक आहे.शिवाय उच्च न्यायलयाचा हे कबुतरखाने हटवा!असा आदेश असताना,हा आदेश ह्या समाजाने तो पायी तुडवला व हातात शस्त्रे घेऊन पुढील कारवाई करत कबुतरखान्याची बंदिस्त मंडपे फाडून उखडून टाकली.त्यांची ना धरपकड ना कोणतीही कारवाई ना जेल भरो आंदोलन? झाले.
मुख्यमंत्री जी काय चाललंय हे तुमच्या राज्यात!पुन्हा अल्लाउद्दीन खिलजिनी ह्या राष्ट्रात जन्म घेतला की काय?अस वाटतंय. स्थानिकांना जिझिया कर आणि परकियांना सूट असं वाटत आहे?आज मराठा समाज लोकशाहीला धरून मोर्चा काढत आहे.त्यांना आझाद मैदानावर अनेक शर्ती व अटी लादून,तुम्ही तुमचंच हसू करून घेताय! ह्या मोर्चाने तुमचं सरकार हतबल झालेलं आहे.हा मोर्चा थोपवण्यात तुम्ही असमर्थ झालेले आहात.तर खुसपट काही तरी काढायची आणि सरकार घाबरलेले नाही असा खोटा आव व बनाव आणायचा हा तुमचा नियमच झालेला आहे.ह्या जनतेनं तुम्हाला निवडून दिलेलं आहे.तुम्हीच त्यांना न्याय हक्कासाठी लढायला विरोध करताय?इतर मोर्चांनी केलेली सरकारी खाजगी मालमत्तेची हानी व तोडफोड आगी लावून ती नष्ट करायची, पोलिसांवर दगडफेक करायची,महिला पोलिसांचे कपडे फाडायचे हे तुम्हाला चालते? लोकशाही मार्गाने गांधीवादी वृत्तीने आंदोलन व मोर्चा आपल्या सरकार ला चालत नाही का?? नक्कीच आपल्या राज्यात लोकशाही ननांदतेय!!तुम्ही कुशल संघटक आणि राजनीतिक आहात असे डावपेचाने राज्याचा आणि देशाचे काय फलीत होणार!!


Share

One thought on “मराठा मोर्चाला अटी तटी ?मात्र कबुतरबाजांना???

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *